घरताज्या घडामोडीकेंद्रीय मंत्र्यांचा मुलगा मविआला मतदान करणार, राज्यमंत्र्यांचा मोठा दावा

केंद्रीय मंत्र्यांचा मुलगा मविआला मतदान करणार, राज्यमंत्र्यांचा मोठा दावा

Subscribe

राज्यसभेच्या निवडणुकीची ( Rajya Sabha elections)   रणधुमाळी सुरू असून मतांची जुळवाजुळव करण्यासाठी मविआच्या राजकीय पक्षांकडून चुरशीचे प्रयत्न सुरू आहे. येत्या १० जून रोजी राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक होणार आहे. ६ जागांसाठी ७ उमेदवार रिंगणात असल्यामुळे ही निवडणूक रंगतदार होणार आहे. केंद्रीय मंत्री आणि भाजपचे खासदार रावसाहेब दानवे यांचे पुत्र आमदार संतोष दानवे हे राज्यसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीला मतदान करतील, असा दावा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार ( Abdul Sattar) यांनी केला आहे.

रावसाहेब दानवे यांच्या घरातून एक मत फोडणार

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या घरातून एक मत फोडणार, रावसाहेब दानवे यांचा मुलगा आमदार संतोष दानवे (MLA Santosh Danave) यांचे मत फुटणार असल्याचा दावा सत्तार यांनी केला आहे. भोकरदन येथे जाऊन भेट घेतल्याचंही सत्तार यांनी म्हटलं आहे. एमआयएमच्या दोन मतांऐवजी आम्ही एका मताची पूर्तता करून घेऊ. परंतु आम्ही त्यांना विनंती केली असून ते आम्हाला मतदान करतील की नाही हे दहा तारखेलाच माहिती पडेल, असं सत्तार म्हणाले.

- Advertisement -

कागदावर सोपी असलेली राज्यसभेची निवडणूक प्रत्यक्षात मात्र शिवसेनेसाठी जड जाण्याची चिन्हे आहेत. भाजपच्या तुलनेत महाविकास आघाडीकडे अतिरिक्त मतांची संख्या जास्त असूनही राज्य सरकारची धाकधूक वाढली आहे.

दानवेंना एक लाख मतांची लीड मिळवून दिली होती

मी संतोष दानवे यांचे वडील रावसाहेब दानवेंना एक लाख मतांची लीड मिळवून दिली होती. त्यामुळे रावसाहेब दानवेंनी त्यांच्या मुलाच्या कानात काही मंत्र दिले त्यांच्या दोघांमध्ये काय बोलणं झालं, ते मला कळालं नाही, असं अब्दुल सत्तार म्हणाले.

- Advertisement -

दरम्यान, शिवसेना आणि भाजप नेत्यांकडून लक्षान पक्षांचे आमदार आणि अपक्ष आमदारांच्या भेटीगाठी घेण्यात येत आहेत. मात्र, भाजपचे नेते आशिष शेलार यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. पक्षाच्या वतीने येत्या राज्यसभा निवडणुकीत मनसेचं जे एक मत आहे ते भाजप उमेदवाराला मिळावं अशी विनंती मी राज ठाकरेंना केली, अशी प्रतिक्रिया आशिष शेलार यांनी दिली आहे.


हेही वाचा : राज्यसभेनंतर विधान परिषदेतही आघाडीचे उमेदवार निवडून येतील – छगन भुजबळ


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -