घरमहाराष्ट्रअब्दुल सत्तारांनी मागास मनोवृत्तीचे दर्शन घडवले - जयंत पाटील

अब्दुल सत्तारांनी मागास मनोवृत्तीचे दर्शन घडवले – जयंत पाटील

Subscribe

मुंबई – मंत्री अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रियाताई सुळे यांच्याविषयी केलेले वक्तव्य अत्यंत दुर्दैवी व निषेधार्ह असून महिला लोकप्रतिनिधीविषयी गलिच्छ भाषेत बोलून सत्तार यांनी त्यांच्या मागास मनोवृत्तीचे दर्शन घडवले आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

हेही वाचा -अब्दुल सत्तारांची सुप्रिया सुळेंवर गलिच्छ भाषेत टीका, माफीसाठी राष्ट्रवादीने दिले 24 तास

- Advertisement -

अब्दुल सत्तार यांनी यापूर्वी देखील अनेक वादग्रस्त वक्तव्ये केलेली आहेत. मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी त्वरित अब्दुल सत्तार यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी जयंत पाटील यांनी ट्वीट करत केली आहे.

- Advertisement -

काय आहे प्रकरण?

सुप्रिया सुळेंनी अलीकडे अब्दुल सत्तारांना 50 खोके मिळाले का, असा प्रश्न केला होता, ज्यावर सत्तारांनी तुम्हालाही द्यायचे का? असा प्रतिप्रश्न केला. सत्तारांच्या या प्रश्नाला प्रत्युत्तर देत सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या की, तुमच्याकडे 50 खोके असल्यानेच तुम्ही ऑफर करत असल्याची टीका पुन्हा केली. ज्यावर आज सत्तारांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सुप्रिया सुळेंना शिवागाळ करत तुम्हालाही देऊ असे उत्तर दिले. सत्तारांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच खवळले आहे, विरोधकांकडून सत्तारांच्या वक्तव्यावर संताप व्यक्त केला जात आहे. तसेच त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहे.

हेही वाचा – …तर मी सॉरी बोलतो; सुप्रिया सुळेंबाबतच्या ‘त्या’ विधानावर अब्दुल सत्तारांचा माफीनामा

सत्तारांनी मागितली माफी

सत्तार म्हणाले की, मी कोणत्याच महिलेविरोधात अपशब्द बोललो नाही. आणि मी जे बोलले ते आम्हाला बदनाम करत आहेत त्यांच्याबद्दल बोललो. सुप्रिया सुळे.. किंवा कोणत्याही महिलेचं मनं दुखवेल असा कोणताही शब्द मी बोललो नाही, जर कोणत्या महिलांना वाटत असेल मी आक्षेपार्ह बोललो, आणि त्यांची मनं दुखावली तर मी जरूर खेद व्यक्त करतो. पण मी असं काही बोललो नाही, जे खोक्यांचा आरोप करत आहेत त्यांनी मी बोललो, मात्र माझ्या बोलण्याचा अर्थ महिलांबाबत काढत आहेत. आमचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि आमदार महिलांचा सन्मान करतात आणि मीही महिलांचा सन्मान करणारा कार्यकर्ता आहे. असे म्हणत सत्तारांनी माघार घेतली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -