घरमहाराष्ट्रकोणी एक मारली तर त्याला चार मारा, अब्दुल सत्तारांचा कार्यकर्त्यांना सल्ला

कोणी एक मारली तर त्याला चार मारा, अब्दुल सत्तारांचा कार्यकर्त्यांना सल्ला

Subscribe

परभणी – कुणी आरे करत असेल तर त्याला कारे करा, एक मारली तर त्याला चार मारा अशा शब्दांत अब्दुल सत्तारांनी आपल्या कार्यकर्त्यांना आवाहन केलं आहे. ते परभणीत बोलत होते. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधला. हिंदू गर्व गर्जना यात्रेनिमित्त राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार परभणी दौऱ्यावर होते.

ग्रामपंचायत सदस्यालाही मेजॉरिटी कळते मात्र यांना कळली नाही. हे फक्त निवेदन घेऊन मागे द्यायचे. आत्ताचे मुख्यमंत्री निवेदन घेऊन प्रश्न सोडवतात, अशी टीका सत्तारांनी केली. येत्या काळात आमच्याकडे अजून दोन-तीन खासदार आणि पाच-सहा आमदारही येणार आहेत, असा गौप्यस्फोटही सत्तार यांनी केला आहे.

- Advertisement -

भाजपाबरोबर निवडणुका लढवल्या. त्यांचे फोटो वापरून निवडणूक जिंकल्या. मात्र यांनी सरकार दुसऱ्यांसोबत स्थापन केले. आमदार, खासदार सर्वजण सांगत असताना त्यांचं कुणीही ऐकलं नाही, असं सत्तार यांनी म्हटलं आहे. ग्रामपंचायत सदस्याला ही मेजॉरिटी कळते मात्र यांना कळली नाही. त्यामुळेच आम्ही यांना सोडून गेलो. तेव्हा हे फक्त निवेदन घेत होते आणि मागच्यांना देत होते. त्यामुळे आमचे प्रश्न सुटले नाहीत. आता एकनाथ शिंदे आणि आम्ही सर्वजण निवेदन स्वीकारून ते सोडवण्याचं काम करत आहेत, असं सत्तार म्हणाले.

शिंदे गटाकडून धमक्यांचा सिलसिला सुरू

- Advertisement -

शिंदे गटातील आमदार सत्तेत आल्यापासून बेछूट आरोप करत आहेत. आरोप करत असताना एकमेकांना मारण्याच्या धमक्याही देत आहेत. काही दिवसांपूर्वी आमदार संतोष बांगर यांनी एका कंत्राटदाराच्या कानाखाली वाजवली होती. तसंच, संजय शिरसाट यांनीही तत्समप्रकारे धमकी दिली होती. त्यामुळे शिंदे गटातील आमदारांकडून धमक्यांचा सिलसिला सुरू असल्याचं मत राजकीय तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येतंय.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -