घरताज्या घडामोडीटीईटी घोटाळ्यात सत्तारांचा संबंध असल्यास चौकशी झाली पाहिजे, अंबादास दानवेंची मागणी

टीईटी घोटाळ्यात सत्तारांचा संबंध असल्यास चौकशी झाली पाहिजे, अंबादास दानवेंची मागणी

Subscribe

शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांच्या मुलींची नावं टीईटी घोटाळ्यात आल्यानंतर विरोधी पक्षांकडून टीका केली जातेय. औरंगाबादमधील शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनीही टीईटी घोटाळ्यात सत्तारांचा संबंध असल्यास चौकशी झाली पाहीजे, अशी मागणी केली आहे.

अंबादास दानवे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, अब्दुल सत्तारांचाही टीईटी घोटाळ्यात संबंध असल्यास त्यासंदर्भात चौकशी झाली पाहीजे. ज्यांचं नाव या घोटाळ्यात आलंय. ते महाराष्ट्राचे आधी महसूल मंत्री होते, ग्रामविकास मंत्री होते आणि त्यांना कॅबिनेटमंत्री व्हायचंय. त्यामुळे शिक्षण खात मिळालं तर आणखी चांगली चौकशी होईल, असं अंबादास दानवे म्हणाले.

- Advertisement -

टीईटी घोटाळा प्रवेश परीक्षेत पात्र नसलेल्यांना प्रमाणपत्र देऊन नोकरीला लावण्यात आल्याचा आरोप आहे. सदर प्रकरणाची महाराष्ट्र शासनाप्रमाणेच ईडीकडूनही चौकशी सुरु आहे. आता शिंदे गटातील आमदार आणि माजी मंत्री अब्दुल सत्तार यांचंही नाव या घोटाळ्यात जोडलं जातंय. या घोटाळ्यात सहभागी असलेल्यांची प्रमाणपत्र रद्द करण्यात येत आहेत.

दरम्यान, भाजपच्या नेतृत्वात शिंदे-फडणवीस सरकार आहे. तुमचं सरकार आहे. त्यासाठी चौकशी लावा. काँग्रेस सरकार असताना शिवाजीराव निलंगेकर यांच्याबाबत असाच आरोप झाला. त्यामुळे त्यांना मुख्यमंत्रिपद सोडावं लागलं होतं. आता अब्दुल सत्तार यांच्यावर आरोप होत असताना त्यांना मंत्रिपदावर घेणार का?, असा सवाल शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी भाजपला विचारला आहे.

- Advertisement -

हेही वाचा : …तर हे सर्व करणाऱ्यांना फासावर लटकवा, TET घोटाळ्यासंदर्भात अब्दुल सत्तारांची


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -