घरमहाराष्ट्रपुणेविठ्ठल कारखाना बंद पाडण्याच्या उद्देशाने छापे, अभिजीत पाटलांचा आरोप

विठ्ठल कारखाना बंद पाडण्याच्या उद्देशाने छापे, अभिजीत पाटलांचा आरोप

Subscribe

पंढरपूर – माझ्यावर छापा टाकायला लावणाऱ्यांची घरे काचेचीच आहेत. मी आता दोन्ही हातांनी दगड मारेन. आयकर विभागाच्या छाप्यात काहीच गैर आढळले नाही, अशी प्रतिक्रिया साखर उद्योजक अभिजीत पाटील यांनी दिली. चार दिवसांच्या आयकर विभागाच्या छाप्यानंतर आज साखर उद्योजक अभिजीत पाटील यांनी पंढरपुरात एका खासगी वृत्त वाहिनीशी बोलताना चौकशीतून काहीच साध्य झाले नसल्याचा खुलासा केला.

अभिजीत पाटील आणि प्रवीण दरेकरांची भेट – 

- Advertisement -

चार दिवस अभिजीत पाटील यांचे पंढरपूरचे कार्यालय, घर आणि त्यांच्या ताब्यात असणाऱ्या उस्मानाबाद, लोहा-नांदेड, चांदवड-नाशिक, सांगोल्यातल्या 4 कारखान्यावर एकाच दिवशी आयकर विभागाने छापा टाकला होता. याशिवाय त्यांचे संचालक असणाऱ्या एकावर कोल्हापूर जिल्हातल्या अर्जुनवाड येथेही छापा पडला होता. त्यांना 28 ऑगस्टला रात्री उस्मानाबाद जिल्ह्यातील चोराखली इथल्या कारखान्यावर नेण्यात आले होते. अभिजीत पाटील आज सकाळी पंढरपूरमध्ये आले आणि येताच विधानपरिषदेमधील भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्यासोबत तिरंगा यात्रेत सहभागी झाल्याने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या. प्रवीण दरेकर अध्यक्ष असणाऱ्या मुंबई डीसीसी बँकेने अभिजित पाटील यांच्या कारखान्यास 70 कोटीचे शॉर्ट लोन घेतल्याने त्यांच्या भेटीकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.

 15 दिवसात कागदपत्रे देणार –

- Advertisement -

यावेळी बोलताना पाटील यांनी आमच्या सर्व कारखाने आणि इतर व्यवसायात त्यांना 1 कोटी 12 लाखांची रोकड सापडली होती. मात्र, ही सर्व रोकड रेकॉर्डवर असल्याने त्यांनी ती जप्त केलेली रक्कम देखील आम्हाला परत दिल्याचे सांगितले. महिलांच्या स्त्री धनात असलेले 50 ते 60 तोळे सोनेही आयकर विभागाने हिशोब बघून परत दिल्याचे सांगताना व्यवहारात ज्या काही त्रुटी आढळल्या आहेत त्याची कागदपत्रे येत्या 15 दिवसात देण्याच्या सूचना आयकर विभागाने दिल्याचे त्यांनी सांगितले. या चार दिवसात अभिजीत पाटील त्यांचे बंधू अमर पाटील, कारखान्याचे संचालक, सभासद आणि कर्मचारी अशा 100 लोकांची चौकशी आयकर विभागाने केल्याचा खुलासाही त्यांनी केला. विठ्ठल सहकारी साखर कारखाना सुरु होऊ नये अशी इच्छा असणाऱ्यांनी आपल्यावर या छापा टाकायला लावल्याचे सांगताना त्यांचीही घरे काचेची आहेत त्यांनी एक दगड मारला आता आमचे दोन्ही हात मोकळे असतील, असा इशारा त्यांनी दिला.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -