अविनाश भोसलेंना मोठा धक्का; 8 जूनपर्यंत सीबीआय कोठडीतच

Abhinash Bhosale remanded in CBI custody till June 8
अभिनाश भोसलेंना 8 जून पर्यंत सीबीआय कोठडी

अभिनाश भोसले यांना 8 जून पर्यंत सीबीआय कोठडी देण्यात आली आहे. विशेष सीबीआय न्यायालयाने हे आदेश दिले आहेत. अभिनाश भोसले यांना डीएचएफएल (DHFL) प्रकरणात तीनशे कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुरूवारी अटक केली होती. शुक्रवारी त्यांना सीबीआय कोर्टात (cbi court) हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायाधीश शिंगाडे यांनी अविनाश भोसले यांना ३० मे पर्यंत नजरकैदेत ठेवण्याचे आदेश दिले होते.

ठेवण्यात आले होते नजरकैदेत –

सीबीआयने डीएचएफएल (DHFL) प्रकरणात अविनाश भोसले त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला होता. गेल्या काही दिवसांमध्ये अविनाश भोसले यांच्या पुणे-मुंबई परिसरातील संपत्तीवर सीबीआयने छापेमारी केली होती. त्यानंतर गुरूवारी त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना वरळीतील घरी नजरकैदेत ठेवण्यात आले होते. त्यांचे वकील आणि कुटुंबातील एकच व्यक्तीला त्यांना भेटण्याची परवानगी होती. त्यांना आज (३० मे) न्यायालयासमोर पुन्हा हजर करण्यात आले यावेळी न्यायालयाने त्यांना 8 जून पर्यंत सीबीआय कोठडी सुनावली.

४० कोटींची संपत्ती जप्त

यापूर्वी ईडीने फेमा कायद्यांतर्गत अविनाश भोसले यांची चौकशी केली होती. त्यांना नोटीस बजावण्यात आली होती. परदेशात त्यांनी केलेल्या गुंतवणूकीबद्दल त्यांची चौकशी करण्यात आली होती. जून २०२१ मध्ये अविनाश भोसले आणि त्यांच्या कुटुंबीयातील सदस्यांच्या नावावरील ४० कोटी ३४ लाख रुपयांची संपत्ती ईडीने जप्त केली होती. विदेशी मुद्रा प्रबंधन अधिनियमांतर्गत ही कारवाई करण्यात आली होती.

अविनाश भोसले यांचे राजकीय संबंध –

अविनाश भोसले कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांचे सासरे आहेत. महाविकास आघाडी सरकारमधील अनेकांची अविनाश भोसले यांचे चांगले संबंध असल्याचे बोलले जाते. पुणे आणि मुंबई बांधकाम उद्योगात अविनाश भोसले यांचे मोठे नाव आहे.