घरक्राइमAbhishek Ghosalkar : अभिषेक घोसाळकर आणि मॉरिस दोघांचा संबंध काय? वाचा सविस्तर

Abhishek Ghosalkar : अभिषेक घोसाळकर आणि मॉरिस दोघांचा संबंध काय? वाचा सविस्तर

Subscribe

मुंबई : दहिसरमध्ये ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या केली. मॉरिसने घोसाळकरांची फेसबुक लाईव्हवर संवाद साधल्यानंतर गोळ्या झाडल्या आणि नंतर मॉरिसने स्वत:ला गोळी मारून आत्महत्या केली आहे. या घटनेत अभिषेक घोसाळकर यांचा मृत्यू झाला. या संपूर्ण घटनेनंतर अभिषेक घोसाळकर आणि मॉरिस या दोघांची काय संबंध आहे, असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

अभिषेक घोसाळकर हे माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे चिरंजीव आहेत. मुंबईतील दहिसर येथील कांदरपाडा प्रभागाचे अभिषेक घोसाळकर हे दोन वेळा नगरसेवक राहिले होते. घोसाळकर हे मुंबै बँकेचे संचालक देखील राहिले आहेत. घोसाळकर यांच्या पत्नी तेजस्विनी या देखील नगरसेविका आहेत. बोरीवली मतदार संघात घोसाळकर यांच्या कुटुंबाचा मोठा दबदबा आहे.

- Advertisement -

हेही वाचा – ABHISHEK GHOSALKAR : “आज लोग बहोत सरप्राइज होंगे…”; अभिषेक यांच्या हत्येपूर्वी दोघांत काय संवाद झाला

कोण आहे मॉरिस

मॉरिस नोरोन्हा ऊर्फ मॉरिस भाई म्हणून ओळखला जातो. मॉरिसवर फसवणूक, बलात्कार आणि खंडणीसारखे गुन्हे दाखल आहेत. मॉरिसने एका महिलेची 88 लाखाची फसवणूक करून तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला होता. यावेळी मॉरिसने महिलेवर धमकी दिल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. यानंतर मॉरिसने वॉर्ड नंबर 1 मधून महापालिकेची निवडणूक लढवली होती.

- Advertisement -

हेही वाचा – Sanjay Raut : “हिंमत असेल तर राष्ट्रपती राजवट लागू करा”, घोसाळकरांच्या हत्येनंतर राऊतांचे आव्हान

घोसाळकर आणि मॉरीस यांचा काय संबध काय?

अभिषेक घोसाळकर आणि मॉरिस हे दोघांमध्ये कट्टर शत्रू होते. राजकीय आणि मालमत्ता यांच्यातून दोघांमध्ये वाद सुरू होता. काही दिवसांपूर्वी दोघांनी वैर विसरून एकत्र येण्याचा निर्णय घेतला होता. या पार्श्वभूमीवर मॉरिसने घोसाळकरांची गुरुवारी (8 फेब्रुवारी) लाईव्हवर संवाद घेतली होती. यानंतर मॉरिसने घोसाळकरांवर गोळ्या झाडून हत्या केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -