घरमहाराष्ट्रगर्भपाताच्या औषधांची ऑनलाईन विक्री कधी थांबणार?

गर्भपाताच्या औषधांची ऑनलाईन विक्री कधी थांबणार?

Subscribe

गर्भपाताच्या गोळ्या ऑनलाईन वेबसाईटवर अगदी सहज उपलब्ध होत असून याविरोधात आता एफडीएकडे तक्रार करण्यात आली आहे. यासंदर्भात लवकरच पोलीस तक्रार दाखल केली जाण्याची शक्यता आहे.

डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही ऑषधं खाऊ नये, ही अगदी बेसिक गोष्ट जवळपास प्रत्येक डॉक्टर आणि विविध मेडिकल संघटना सांगत असतात. मात्र तरीदेखील ती गोष्ट प्रत्यक्षात उतरताना दिसत नाही. गर्भपातासारख्या उपचारासाठी तर अगदी सर्रासपणे गोळ्या ऑनलाईन मागवल्या जात आहेत आणि त्यांचं सेवन केलं जात आहे. शिवाय, ऑनलाईन कंपन्यांकडून गर्भपाताची औषधं मागवली असता ती घरपोच मिळत असल्याचंही समोर आलं आहे. या प्रकरणी एफडीएकडे तक्रार केली असता लवकरच याबाबत पोलिसांत तक्रार केली जाणार आहे. यापूर्वी देखील अशा अनेक घटना घडल्या आहेत. शिवाय, कंडोम्स आणि गर्भनिरोधक गोळ्याही सहज ऑनलाईन उपलब्ध होत आहेत.

गर्भपाताच्या गोळ्या मिळतात सहज

एका क्लिकवर सहज उपलब्ध होणाऱ्या गर्भपाताच्या गोळ्यांच्या सततच्या वापरामुळे महिलांच्या शरीरावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे, एकूणच होणाऱ्या ऑनलाईन औषध विक्रीला फार्मासिस्ट संघटनांकडून गेल्या काही वर्षांपासून विरोध होत आहे. गर्भपाताच्या गोळ्या या डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय घेऊ नये, असा सल्ला दिला जातो. शिवाय, गर्भपातासाठी स्त्रीरोगतज्ज्ञांचा सल्ला आणि परवानगी महत्त्वाची असते. पण, ऑनलाईन औषधं उपलब्ध होत असल्याकारणाने या गोष्टींचा विचार केला जात नाही. त्यामुळे, गर्भपाताच्या औषधांची ऑनलाईन विक्री जोरात सुरू आहे. ही औषधे हवी तेवढी आणि हवी तिथे मिळत असल्याचा दावा पुन्हा एकदा महाराष्ट्र रजिस्टर फार्मासिस्ट असोसिएशनकडून करण्यात आला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – ऑनलाईन विरोधात केमिस्टचा हल्लाबोल

बंद करूनही पुन्हा झाली सुरुवात

जून महिन्यामध्ये यासंदर्भात झालेल्या तक्रारींनंतर काही कालावधीसाठी ही ऑनलाईन गोळ्यांची विक्री बंद करण्यात आली होती. रायगडच्या पेणमध्ये यासंदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल करण्यात आली होती. मात्र, नंतर पुन्हा अशा प्रकारची विक्री सुरू करण्यात आली. त्यामुळे या प्रकरणी कठोर कारवाई करण्याची मागणी आता करण्यात येत आहे.

एफडीए कारवाई करेल का?

काही दिवसांपूर्वी राज्याच्या रजिस्टर्ड फार्मासिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष कैलास तांदळे यांनी देखील गर्भपाताच्या गोळ्या मागवल्या होत्या. त्यांनाही अगदी सहज या गोळ्या उपलब्ध झाल्या. त्यासंदर्भात एफडीएला कळवून पोलिसांत तक्रार देखील करण्यात आली होती. याविषयी अधिक माहिती देताना महाराष्ट्र रजिस्टर्ड फार्मासिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष कैलास तांदळे यांनी सांगितलं की, “मी पुन्हा या गोळ्या मागवल्या आहेत. त्या गोळ्या लवकरच घरपोच मिळण्याची शक्यता आहे. अजूनही बेकायदेशीररीत्या ऑनलाईन या गोळ्यांची विक्री सुरू आहे. यासाठी एफडीने योग्य ती कारवाई केली पाहिजे.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -