घरताज्या घडामोडीराज ठाकरेंच्या अयोध्य्या दौऱ्याच्या विरोधाला महाराष्ट्रातून पाठींबा, 'या' नेत्याचा ब्रिजभूषण यांना फोन

राज ठाकरेंच्या अयोध्य्या दौऱ्याच्या विरोधाला महाराष्ट्रातून पाठींबा, ‘या’ नेत्याचा ब्रिजभूषण यांना फोन

Subscribe

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दौऱ्याला उत्तर प्रदेशचे खासदार ब्रिज भूषण सिंह यांनी विरोध केला आहे. राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांची माफी मागावी अशी मागणी केली आहे. ब्रिज भूषण यांच्या विरोधानंतर आता महाराष्ट्रातुनसुद्धा पाठींबा देण्यात येत आहे. राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याचे भाजपकडून स्वागत करण्यात आले आहे. परंतु भाजप खासदारानेच राज ठाकरेंना आव्हान दिलं आहे. यूपीचे मुख्यमंत्री योगींचा फोन गेला तरी खासदाराने माघार घेतली नसल्याचे समजते आहे. यामध्ये आता महाराष्ट्रातुन पाठींबा देण्यात आल्यामुळे राज ठाकरेंच्या दौऱ्याला विरोध वाढला आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला महाराष्ट्रातून समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांनीसुद्धा विरोध केला आहे. उत्तर प्रदेशचे खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंना अयोध्येत पाय ठेवू देणार नाही असे सांगितले आहे. या भूमिकेचेसुद्धा ब्रिजभूषण सिंह यांनी स्वागत केलं आहे. मशिदींवरील भोंग्यांविरोधात राज ठाकरेंनी भूमिका घेतली आहे. त्यामुळे राज्यातील मुस्लिम नेतेसुद्धा राज ठाकरेंविरोधात भूमिका घेत आहेत. राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यासाठी राज्यातून विरोध वाढला आहे.

- Advertisement -

राज ठाकरेंना अयोध्येत पाय ठेवू देणार नाही

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना उत्तर प्रदेशमध्ये पाय ठेवू देणार नाही. राज ठाकरे मिलिट्री घेऊन आले तरी त्यांना आम्ही अयोध्येत येऊ देणार नाही. आमच्या मृतदेहावरून राज यांना जावं लागेल असा थेट इशारा ब्रिजभूषण सिंह यांनी दिला आहे. मनसेने २००८ पासून महाराष्ट्रातील उत्तर भारतीय, फेरीवाले, यूपी बिहारच्या लोकांवर अन्याय केला आहे. त्यांना मारहाण केली आहे. त्यामुळे राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांची माफी मागावी अन्यथा अयोध्या दौऱ्यावर येऊ देणार नाही असे ब्रिजभूषण सिंह यांनी म्हटलं आहे. राज ठाकरेंना माफी मागण्यासाठी वेळ देण्यात आला होता तो सुद्धा संपला असल्यामुळे ब्रिजभूषण यांनी आपली भूमिका कायम ठेवली आहे. राज ठाकरेंच्या दौऱ्याला विरोध करणारच असे त्यांनी म्हटलं आहे.


हेही वाचा : जातीयवादावरुन केलेल्या वक्तव्याचा आस्वाद घेतला, शरद पवारांचे टीका करणाऱ्यांना उत्तर

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -