घरताज्या घडामोडी'सरकार सेनेचे नाही; मुस्लिम नेत्यांनो तुम्हाला लाजा वाटायला हव्यात'

‘सरकार सेनेचे नाही; मुस्लिम नेत्यांनो तुम्हाला लाजा वाटायला हव्यात’

Subscribe

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यावरुन अबू आझमी नाराज असल्याचे समोर आले आहे.

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनेक विषयांवर वक्तव्य केले. त्यावेळी बाबरी मशिद हा देखील मुद्दा मांडण्यात आला होता. त्यावेळी ते म्हणाले की, ‘तुम्ही वेळोवेळी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंची आठवण काढता. जर तुम्ही त्यांना विसरलात नसाल तर त्यांच हिंदुत्व लक्षात ठेवा. बाबरी ज्यावेळी पाडली त्यावेळी सर्व जण पळून गेले होते. मात्र, एकडे बाळासाहेब त्याठिकाणी उपस्थित होते. तसेच ज्यांनी बाबरी पाडली ते शिवसैनिक असतील तर मला त्यांचा अभिमान आहे, असे देखील बाळासाहेब म्हणाले होते’. मात्र, या वक्तव्यावरुन समाजवादी पक्षाचे नेचे अबू आझमी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बाबरी मशिदीसंदर्भात केलेले वक्तव्य योग्य नव्हते’.

- Advertisement -

मुस्लिम नेत्यांनी निषेध करावा

‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बाबरी मशिदीसंदर्भात केलेले वक्तव्य योग्य नाही. त्यामुळे या वक्तव्यावरुन महाविकासआघाडी सरकारमधील मुस्लिम नेत्यांनी वक्तव्याचा निषेध करुन राजीनामे द्यायला हवेत’, असे वक्तव्य समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी केले आहे. तसेच ‘उद्धव ठाकरे आता शिवसेनेचे नेते नाहीत तर ते राज्याचे प्रमुख आहेत’, त्यामुळे त्यांनी असे बोलायला नको होते. ही खूपच दुख:द घटना आहे. विशेष म्हणजे हे सरकार कॉमन मिनिमम प्रोग्रामने चालते. ज्यावेळी उद्धव ठाकरे यांनी मशिद पाडण्याचे समर्थ केले. त्यावेळी मुस्लिम नेत्यांना लाज वाटायला हवी होती. तर बाबरी मशीद पाडणे हे गुन्हेगारी कृत्य असल्याचा निकाल न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारमधील मुस्लिम नेत्यांनी एव्हाना राजीनामा द्यायला पाहिजे होता, असे वक्तव्य अबू आझमी यांनी केले.

- Advertisement -

हेही वाचा – फडणवीसांवर आक्षेपार्ह लिहिणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यावर कारवाई करणार – अजित पवार


 

Pradnya Ghogalehttps://www.mymahanagar.com/author/pradnya/
पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. सामाजिक, आरोग्यविषयक विषयांवर लिहिण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -