सत्ताधारी आमदारांनी शिवीगाळ केली; धक्काबुक्कीनंतर अमोल मिटकरींची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज पाचवा दिवस आहे. पहिल्या चार दिवसांत अधिवेशनामध्ये विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. या अधिवेशनाच्या कामकाजापूर्वी विधानभवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले. सत्ताधारी आमदार विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत असताना विरोधकांनीही आदोलनाला सुरूवात केली.

विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज पाचवा दिवस आहे. पहिल्या चार दिवसांत अधिवेशनामध्ये विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. या अधिवेशनाच्या कामकाजापूर्वी विधानभवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले. सत्ताधारी आमदार विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत असताना विरोधकांनीही आदोलनाला सुरूवात केली. त्यावेळी शिवीगाळ केल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला. तसेच, या प्रकाराबद्दल एकनाथ शिंदेंकडे तक्रार केल्याचीही माहिती मिटकरी यांनी दिली. (Abused by ruling MLAs Amol Mitkari complains to the Chief Minister after the shock in vidhan bhavan maharashtra assembly monsoon session)

“विधानभवनाच्या पायऱ्यांवर आम्ही आंदोलन करत होतो. काल महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये चर्चा झाली की शेतकऱ्यांचा मुद्दा महत्त्वाच आहे. त्यामुळे ओल्या दुष्काळाची मागणी करायची. म्हणून आम्ही 10:30 वाजता पायऱ्यांवर जमायचे ठरवले होते. मात्र, सत्ताधारी आमच्या आधी तिथे पोचले आणि आंदोलन करायला सुरुवात केली. कोणीतरी शिंदे गटातल्या शिंदे नावाच्या आमदाराने तिथे धक्काबुक्की केली, आम्हाला आई-बहिणीवरुन शिवीगाळ केली. आम्ही संस्कृती जपणारी, पवार साहेबांच्या विचारांवर चालणारी माणसे आहोत. या घटनेनंतर आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली आणि त्यांना सांगितलं की आम्हाला शिवीगाळ करणाऱ्यांना समज द्या. आम्ही विरोधी पक्ष आहोत, आम्ही जाब विचारणारच. आमची 50 खोके एकदम ओक्के घोषणा त्यांच्या जिव्हारी लागली. आमचे आंदोलन शांततेत सुरू होते. हे राज्याला न शोभणारे आहे. शिंदे गटातल्या शिंदे नावाच्या आमदाराने धक्काबुक्की केली, पत्रकारांनी धक्काबुक्की केली. त्यानंतर अजितदादांनी समजावून सांगितले आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीला नेले”, असे विधानभवनाच्या पायऱ्यांवर झालेल्या धक्काबुक्कीनंतर आमदार अमोल मिटकरी यांनी सांगितले.

विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांविरोधात जोरदार घोषणबाजी करण्यात येत आहे. त्यानुसार, विरोधकांनी पायऱ्यांवर आंदोलन करत “पन्नास खोके एकदम ओके तर खाऊन खाऊन पन्नास खोके, माजलेत बोके माजलेत बोके”, अशा घोषणा देण्यात आल्या आहेत. तसेच, “फिफ्टी फिफ्टी, चलो गुवाहाटी चलो गुवाहाटी…. ईडी सरकार हाय हाय…. पन्नास खोके, पन्नास खोके, खाऊन खाऊन माजलेत बोके…. आले रे आले, गद्दार आले….”, अशाही घोषणा विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर दिल्या.


हेही वाचा – राज्यात धर्मांतराचे रॅकेट, ‘रेट कार्ड’द्वारे तरुणांना आर्थिक बळ; नितेश राणेंचा विधानसभेत आरोप