Eco friendly bappa Competition
घर ताज्या घडामोडी अवैध मालमत्ता प्रकरण : ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुखांना एसीबीची नोटीस

अवैध मालमत्ता प्रकरण : ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुखांना एसीबीची नोटीस

Subscribe

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांना एसीबीने नोटीस पाठवली आहे. नितीन देशमुख यांना 17 जानेवारी रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांना एसीबीने नोटीस पाठवली आहे. नितीन देशमुख यांना 17 जानेवारी रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राजापूरचे आमदार राजन साळवी आणि कुडाळ मालवण मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांना याआधी एसीबीने नोटीस पाठवली होती. त्यानंतर आता नितीन देशमुख यांना एसीबीने नोटीस पाठवली आहे. त्यामुळे आता ठाकरे गटाच्या चिंतेत वाढ झाली आहे. (ACB notice to Thackeray MLA Nitin Deshmukh Order to appear)

एसीबीच्या नोटीसनंतर ‘एबीपी माझा’ या वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी याबाबत माहिती दिली. “17 जानेवारी रोजी अमरावतीमध्ये हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मालमत्तेची माहिती देण्यास सांगितलं आहे. 17 तारखेला मी अमरावतीमधील कार्यालयात हजर राहणार आहे. मी चौकशीसाठी हजर राहणार आहे. पण तक्रार देणाऱ्याचं नोटीसमध्ये नाव नाही. एखाद्या आमदाराला नोटीस पाठवलाता कुणाची तक्रार आहे, त्याचा उल्लेख असायला हवा. पण नोटीसमध्ये तसा उल्लेख नाही. माझ्याकडे कोणती संपत्ती अवैध आहे, त्याचाही उल्लेख नाही. 17 तारखेला अमरावतीमध्ये रितसर पत्रकार परिषद घेऊन माहिती देईल. तक्रारकर्त्याच्या नाव न सांगण्याच्या अटीवर मला नोटीस पाठवण्यात आली आहे. तक्रारकर्त्याचं नाव समोर आल्यानंतर सत्य समोर येईल. त्याला कुणी तक्रार द्यायला लावलं, हे समजेल 17 तारखेला पत्रकार परिषद घेऊन माहिती देईल”, असे नितीन देशमुख यांनी सांगितले.

- Advertisement -

17 तारखेला नितीन देशमुख अमरावती येथील लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात चौकशीसाठी उपस्थित राहण्याची शक्यता आहेत. दरम्यान, एसीबीने आतापर्यंत ठाकरे गटाच्या तीन आमदारांना नोटीस पाठवली आहे. सुरूवातीला राजापूरचे आमदार राजन साळवी, कुडाळ मालवण मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक आणि आता बाळापूर मतदारसंघाचे आमदार नितीन देशमुख यांना एसीबीने नोटीस पाठवली आहे.

एसीबीच्या नोटीसमध्ये काय?

- Advertisement -

उघड चौकशी संबधाने जबाब देणे कामी उपस्थित राहण्याबाबत नितीन देशमुख यांना एसीबीने नोटीस पाठवली आहे. आपल्याविरुद्ध उघड चौकशी क्रमांक ईऔ/46/अकोला/2022 अन्वये आपल्या संपत्तीची उघड चौकशी लाचलुचपत प्रतिबंध विभाग अमरावती परीक्षेत्रात अमरावती येथे सुरु आहे. या उघड चौकशीचे संबधाने आपले बयान नोंदविणे आवश्यक असल्याने बयान देणेकरिता आपण 17 जानेवारी सकाळी अकरा वाजता अपर पोलीस अधिक्षक कार्यालय लाचलुचपत प्रतिबंध विभाग अमरावती येथे उपस्थित राहवे. तसेच सोबत दिलेल्या मत्ता दायित्व फ़र्म क्रमांक एक ते साची संपूर्ण माहिती भरुन द्यावी.


हेही वाचा – मोठी बातमी! बीडीडी चाळ परिसरातील झोपडपट्टीधारकांना मिळणार ३०० चौ. फुटांचे घर

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -