घरमहाराष्ट्रसांगलीत केमिकल टँकर आणि ट्रकची धडक होऊन भीषण स्फोट

सांगलीत केमिकल टँकर आणि ट्रकची धडक होऊन भीषण स्फोट

Subscribe

अपघातानंतर केमिकल टँकरच्या गाडीचा स्फोट झाला आणि यामध्ये दोन्ही ट्रकला भीषण आग लागली. काही क्षणात आगीने भीषण रूप धारण केल्याने दोन्ही ट्रक जळून खाक झाले आहेत.

सांगलीच्या विटा नजीकच्या मायणी रोडवर केमिकल टँकर आणि ट्रकची समोर-समोर धडक होऊन भीषण स्फोट झाला आहे. या अपघातात दोन्ही ट्रक भीषण आगीत जळून खाक झाले आहेत. दरम्यान या गाडीत पाच ते सहा जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत असून घटनास्थळी विटा आणि तासगाव पालिकेचे अग्निशमन गाड्या दाखल झाल्या असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहे.

समोरा- समोर धडक

सांगलीच्या विटा नजीक असणाऱ्या चिकलहोळ गावाशेजारी केमिकल टँकर आणि आयशर टेम्पोची समोरासमोर धडक होऊन स्फोट झाला आहे. यामध्ये लागलेल्या भीषण आगीत दोन्ही ट्रक जळून खाक झाले आहेत. दरम्यान या आगीमध्ये पाच ते सात जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तर घटनास्थळी जळालेल्या अवस्थेत एक मृतदेह आढळून आला आहे. विट्याहून केमिकलचा टँकर हा मायणी कडे तर मायणी हुन एक आयशर ट्रक विटयाकडे निघाला होता. यावेळी चिखलहोळ हद्दीत सिमेंटपोल फॅक्टरी जवळ हे दोन्ही ट्रक आले असता समोरा-समोर जोरदार धडक झाली.

- Advertisement -

दोन्ही गाड्या जळून खाक

अपघातानंतर केमिकल टँकरच्या गाडीचा स्फोट झाला आणि यामध्ये दोन्ही ट्रकला भीषण आग लागली. काही क्षणात आगीने भीषण रूप धारण केल्याने दोन्ही ट्रक जळून खाक झाले आहेत. तर यामध्ये दोन्ही ट्रक मधील चालकासह पाच ते सहा जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान घटनास्थळी आगीचे प्रचंड लोळ उठले होते. तर यावेळी एका व्यक्तीचा जळलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला आहे. या घटनेची माहीती मिळताच घटनास्थळी विटा तासगाव नगरपालिकेचे अग्निशमन गाड्या दाखल झाले आहेत. त्याचबरोबर विटा पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. तर या आगीत पाच ते सहा जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत असून आगीवर नियंत्रण मिळाल्यानंतरच मृत्यूच्या आकडा स्पष्ट होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -