घर महाराष्ट्र Accident : शाळेजवळच सिमेंटचा बल्कर उलटला; पाच जणांचा मृत्यू

Accident : शाळेजवळच सिमेंटचा बल्कर उलटला; पाच जणांचा मृत्यू

Subscribe

दक्षिण सोलापूर तालुक्यातील सिमेंट फॅक्टरीतून सिमेंट घेऊन सोलापूरच्या दिशेने जाणारा सिमेंटचा बल्कर औज (आ) येथील जिल्हा परिषद शाळेसमोर उलटला.

सोलापूर : सोलापूरमधील होटगी गावाजवळ सिमेंटचा बल्कर उलटून झालेल्या अपघात 4 जणांचा मृत्यू झाला. ही घटना 1 सप्टेंबर रोजी दुपारी घडली. मृतकांमध्ये इयत्ता तिसरीत शिकणाऱ्या मुलीचा समावेश आहे. या घटनेनंतर ग्रामस्थ आक्रमक झाले.(Accident : Cement bulker overturned near school; Five people died)

दक्षिण सोलापूर तालुक्यातील सिमेंट फॅक्टरीतून सिमेंट घेऊन सोलापूरच्या दिशेने जाणारा सिमेंटचा बल्कर औज (आ) येथील जिल्हा परिषद शाळेसमोर उलटला. उलटलेल्या सिमेंट बल्करखाली शाळकरी मुलांसह एका वृद्धाचा समावेश असल्याची माहिती आहे.

- Advertisement -

वळसंग पोलिसांची शोध मोहीम सुरू असून, आतापर्यंत बल्करखाली चेंगरलेली एक चिमुकली पोलिसांना सापडली आहे. वळसंग पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सनगल्ले हे स्वत: त्याठिकाणी उपस्थित आहेत. सिमेंट बल्कर चालक तेथून पसार झाल्याचीही माहिती पुढे येत आहे.

ग्रामस्थ झाले आक्रमक

अपघातस्थळी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. ग्रामस्थांच्या मदतीने पोलिसांकडून सिमेंट बल्कर उचलण्यात आला. मात्र यावेळी ग्रामस्थ आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. हा अपघात टायर पंक्चर झाल्याने की अन्य कोणत्या कारणाने झाले याबाबत अद्याप माहिती पुढे आली नाही.

- Advertisement -

हेही वाचा : मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 वर बस-ट्रकचा भीषण अपघात, घाटात घडली घटना

नेहमीच सुरू असते जड वाहतूक

अपघातानंतर औज येथील ग्रामस्थ आक्रमक झाले. औज गावाच्या पूढे चेट्टीनाड व झुअरी सिमेंटच्या कंपन्या आहेत. सिमेंटच्या वाहनांची मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. यापूर्वी गावातील एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. प्रशासनाकडे तक्रार करून देखील ही वाहतूक बंद केली नाही. ग्रामस्थांनी पोलिसांच्या मदतीने चार मृतदेह बाहेर काढले. मृतदेहाची रुग्ण वाहिका ग्रामस्थांनी रोखली आहे. यामुळे तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे.

हेही वाचा : ‘इंडिया’चा जागावाटप फॉर्म्युला ठरला… Give And Take, तीन ठरावही संमत

 

मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर बस-ट्रकचा भीषण अपघात

मध्य प्रदेश परिवहनच्या बसचा भीषण अपघात झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 वरील बिजासण घाटात ही घटना घडली. आज (ता. 01 सप्टेंबर) सकाळच्या सुमारास ही घटना घडली असून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने मध्य प्रदेश परिवहनच्या बसला मागून धडक दिल्याचे सांगण्यात येत आहे. ज्या ट्रकने या बसला धडक दिली, त्या ट्रकचे ब्रेक फेल झाले होते आणि ज्यामुळे हा अपघात घडला असल्याचे सांगण्यात आले आहे. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून 30 पेक्षा अधिक जण जखमी झाल्याचे सांगण्यात आले आहे.

- Advertisment -