घरमहाराष्ट्रदेहूरोड येथे कारचा भीषण अपघात; तीन जण जागीच ठार

देहूरोड येथे कारचा भीषण अपघात; तीन जण जागीच ठार

Subscribe

मुंबई-बंगळुरू महामार्गावर देहूरोड येथे रविवारी सकाळी ६ च्या सुमारात कार आणि ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाल्याचे समजते.

मुंबई-बंगळुरू महामार्गावर देहूरोड येथे आज, रविवारी सकाळी ६ च्या सुमारात कार आणि ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाल्याचे समजते. स्विफ्ट कारची ट्रकला धडक बसल्याने हा अपघात झाला. या अपघातात एक जण जखमी झाला असून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. पावसामुळे समोरचे काहीच दिसत नसल्याने भरधाव वेगात आलेल्या स्विफ्ट कारने ट्रकला जोरदार धडक दिली. त्यात स्विफ्ट कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती कळताच ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमींना जवळच्याच रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

- Advertisement -

स्विफ्ट कारचा चेंदामेंदा 

पराग हेरगांवकर, सूरज राजेंद्र मांजरे, अभिषेक शर्मा अशी अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. तर एक जण गंभीर जखमी आहे त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईहून पुण्याच्या दिशेने भरधाव वेगात असणाऱ्या स्विफ्टने रस्त्याच्या कडेला उभा असलेल्या ट्रकला पाठीमागून जोरात धडक दिली. यात तिघांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी आहे. स्विफ्ट भरधाव वेगात होती. अपघातात स्विफ्ट कारचा चेंदामेंदा झाला आहे. जखमींवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. घटनेचा अधिक तपास देहूरोड पोलीस करत आहेत. घटनास्थळी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे, देहूरोड वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर हे दाखल होते.

- Advertisement -

हेही वाचा –

एक्सप्रेस हायवेवरील बोरघाटात दरड कोसळली

तिवरे धरण दुर्घटना : १९ जणांचे मृतदेह सापडले; ४ जण अजूनही बेपत्ता

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -