घरमहाराष्ट्रदादर-माटुंग्याजवळ 2 एक्स्प्रेसमध्ये अपघात; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

दादर-माटुंग्याजवळ 2 एक्स्प्रेसमध्ये अपघात; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

Subscribe

मध्य रेल्वेच्या दादर स्थानकात 2 एक्स्प्रेस आमने-सामने आल्याची घटना घडली. मध्य रेल्वे मार्गावर रात्री १० वाजताच्या सुमारास ही घटना घडली. गदग एक्स्प्रेस आणि दादर-पद्दुचेरी एक्सप्रेस आमने-सामने आल्याची माहिती समोर येत आहे.

मध्य रेल्वेच्या दादर आणि माटुंगा स्थानकादरम्यान 2 एक्स्प्रेस रेल्वे गाड्यांचा अपघात झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे. मध्य रेल्वे मार्गावर रात्री 9.45 वाजताच्या सुमारास ही घटना घडली असून, गदग एक्स्प्रेस आणि दादर-पद्दुचेरी एक्सप्रेसमध्ये हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे मध्य रेल्वेच्या दादर स्थानकातील 5 क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मवर ही घटना घडल्यानं लांब पल्ल्यांच्या गाड्यांच्या वेळापत्रकावर याचा परिणाम झाला आहे. या 2 एक्स्प्रेसच्या अपघातामुळे मध्य रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता आहे.

मध्य रेल्वेच्या दादर आणि माटुंगाच्या रेल्वे स्थानकांदरम्यान ही घटना घडली असून, दादर-पद्दुचेरी एक्सप्रेसचे मागील 3 डबे रेल्वे रुळावरून घसल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या दुर्घटनेत जीवितहानी झालेली नसून घटनास्थळी रेल्वेचे अधिकारी पोहोचले आहेत. तसेच रेल्वेच्या घसरलेल्या डब्यांना पुन्हा रुळावर आणण्याचं काम सुरू आहे. मात्र 2 एक्स्प्रेसच्या या अपघातामुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीचा खोळंबा झाला असून, रेल्वे फलाटांवर कामावरून घरी परतणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी रेल्वेचे कर्मचारी, दादर रेल्वे पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले आहेत.

- Advertisement -

”11005 दादर-पद्दुचेरी एक्सप्रेस ही दादरच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वरून निघाली. त्याचवेळी या एक्सप्रेसच्या मागून सीएसएमटी स्थानकातून निघालेली गदग एक्स्प्रेसच्या इंजिनने दादर-पद्दुचेरी एक्सप्रेसला धडकलं. त्यामुळे दादर-पद्दुचेरी एक्सप्रेस मागचे तीन डबे रुळावरून घसरलेत. सुरक्षेच्या दृष्टीने अप आणि डाऊन जलद मार्गावरील ओव्हरहेड व्हायरचा वीजप्रवाह खंडित करण्यात आला आहे”, अशी माहिती मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली. मध्य रेल्वे प्रशासनाने या अपघातानंतर या मार्गावरील इतर गाड्यांच्या मार्गात बदल केला आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागत आहे.

दरम्यान, या धडकेत दादर-पद्दुचेरी एक्सप्रेसच्या 3 डब्यांचे मोठं नुकसान झालं आहे. या घटनेमुळं गदग एक्स्प्रेस आणि दादर-पद्दुचेरी एक्सप्रेसमध्ये असलेल्या प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. प्रवाशांनी सुरक्षेच्या दृष्टीने एक्सप्रेसमधून खाली उतरले आहेत. घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली आहे.

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -