घरमहाराष्ट्रAccident News : आचार्य विद्यासागर यांच्या अंत्यदर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या गाडीला अपघात; तिघांचा...

Accident News : आचार्य विद्यासागर यांच्या अंत्यदर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या गाडीला अपघात; तिघांचा मृत्यू

Subscribe

गोंदिया : प्रसिद्ध जैन धर्मातील दिगंबर पंथियाचे संत आचार्य विद्यासागर महाराज यांचे शनिवारी (17 फेब्रुवारी) रात्री उशिरा निधन झाले. आचार्य विद्यासागर यांच्या निधनानंतर मध्य प्रदेश सरकारने अर्ध्या दिवसाचा राजकीय दुखवटा जाहीर केला आहे. दरम्यान, आचार्य विद्यासागर यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी जाणाऱ्या मध्य प्रदेशच्या सतना येथील भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात झाला. यात तिघांचा जागीच मृत्यू झाला असून इतर तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. (Accident News An accident in the car of devotees going for the last darshan of Acharya Vidyasagar Three deaths)

हेही वाचा – Rajni Satav : काँग्रेस नेत्या रजनी सातव यांचे निधन; 76 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

- Advertisement -

प्रसिद्ध जैन धर्मातील दिगंबर पंथियाचे संत आचार्य विद्यासागर यांचे शनिवारी रात्री 2 वाजून 35 मिनिटांनी वृद्धपकाळाने निधन झाले. आचार्य विद्यासागर यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी मध्य प्रदेश राज्यातील रिवा जिल्ह्यातून छत्तीसगडच्या राजनांदगाव जिल्ह्यातील डोंगरगडकडे येण्यासाठी हे भाविक शनिवारी रात्रीच निघाले होते.  डोंगरगडच्या हद्दीतील कालव्याजवळ चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी नियंत्रणाबाहेर जाऊन पानगाव मुंडीपार दरम्यान कालव्यात पडली. कारमधून 6 भाविक प्रवास करत होते. जैन भाविक जितेंद्र जैन, आशिष जैन, प्रशांत जैन यांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर अंशुल जैन, वर्धमान जैन, अप्पू जैन या तिघांची प्रकृती चिंताजनक आहे.

हेही वाचा – Aaditya Thackeray : घटनाबाह्य मुख्यमंत्री आज अवकाळी सरकार म्हणून…; ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा

- Advertisement -

आचार्य विद्यासागर महाराजांचा जीवनप्रवास

आचार्य विद्यासागर हे जैन समाजाचे प्रसिद्ध शिक्षक होते. त्यांचा जन्म ऑक्टोबर 1946 मध्ये कर्नाटक राज्यातील बेळगावी जिल्ह्यातील सदलगा याठिकाणी झाला. राजस्थानचे गुरु आचार्य ज्ञानसागर महाराज यांच्याकडून 1968 मध्ये त्यांना मुनी दीक्षा मिळाली. त्यानंतर 22 नोव्हेंबर 1972 रोजी वयाच्या अवघ्या 26 वर्षी त्यांना आचार्य पद देण्यात आले. आचार्य विद्यासागर यांच्या भावानीही संन्यास घेतला होता. त्यांचे भाऊ अनंतनाथ आणि शांतीनाथ यांनी आचार्य श्रींकडून दीक्षा घेतली होती आणि त्यानंतर त्यांना मुनी समय सागर आणि योगसागर म्हटले गेले. आचार्य विद्यासागर यांना हिंदी आणि इंग्रजीसह 8 भाषांचे ज्ञान होते. त्यांनी मुख्य ग्रंथ मूकमाटी महाकाव्य ग्रंथ लिखाण केले. हा ग्रंथ संस्कृतमधील लिखाणांनंतर 8 भाषेत अनुवादित करण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -