Saturday, June 10, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी खोपोलीत 48 विद्यार्थ्यांनी भरलेल्या बसचा भीषण अपघात; 2 जणांचा मृत्यू

खोपोलीत 48 विद्यार्थ्यांनी भरलेल्या बसचा भीषण अपघात; 2 जणांचा मृत्यू

Subscribe

खोपोलीमध्ये विद्यार्थी असलेल्या एका लक्झरी बसचा भीषण अपघात झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. या बस अपघातात 2 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच, काही विद्यार्थी जखमी झाले असून, ११ विद्यार्थ्यांना गंभीर दुखापत झाल्याचे समजते.

खोपोलीमध्ये विद्यार्थी असलेल्या एका लक्झरी बसचा भीषण अपघात झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. या बस अपघातात 2 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच, काही विद्यार्थी जखमी झाले असून, ११ विद्यार्थ्यांना गंभीर दुखापत झाल्याचे समजते. रविवारी संध्याकाळी ८ वाजताच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती मिळते. घटनास्थळी स्थानिक पोलिसांनी धाव घेतली असून, बचावकार्य करत आहेत. (accident of bus carrying 48 students in Khopoli 2 people died)

मिळालेल्या माहितीनुसार, चेंबूरच्या मयांक या खासगी क्लासेसची सहल रविवारी सकाळी निघाली होती. वेट एँण्ड जॉयला ही सहल गेली होती. विद्यार्थ्यांनी पूर्ण क्षमतेने भरलेली ही बस ड्रायव्हरचा ब्रेक फेल झाल्याने आणि गाडीवरील ताबा सुटल्याने उलटली. खंडाळा घाटात उतरताना ही अपघात झाल्याचे समजते.

- Advertisement -

या बसच्या अपघातात दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये एका मुलाचा आणि मुलीचा समावेश आहे. रितीका खन्ना असे मृत मुलीचे नाव असून, अद्याप मृत मुलाचे नाव समजलेले नाही. पोलीस मृत मुलाची ओळख पटवत आहेत.

या अपघातानंतर स्थानिक आणि पोलिसांच्या मदतीने जखमींना उपचारांसाठी एमजेएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या बसमध्ये एकूण 48 विद्यार्थी होते. यातले अनेक ३५ जण जखमी असून ११ विद्यार्थी गंभीर जखमी असल्याची प्राथमिक माहिती मिळते.


- Advertisement -

हेही वाचा –  समृद्धी महामार्गाचे लोकार्पण, पंतप्रधान मोदींची सभा आणि त्यानंतर ‘या’ भागाचं मोठं नुकसान; वाचा नेमकं काय घडलं?

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -