शिवज्योत घेऊन जात असताना शिवभक्तांचा अपघात, १० जण गंभीर जखमी

shivjayanti

Shivjayanti 2023 | पुणे – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवज्योत घेऊन जाणाऱ्या शिवभक्तांचा पुण्यात भीषण अपघात झाला आहे. शिवभक्तांच्या टेम्पोला कंटेनरने धडक दिल्याने बंगळुरू मुंबई बायपासजवळ अपघात घडला. या अपघातात ३० ते ३५ शिवभक्त जखमी झाले असून यापैकी १० जण गंभीर जखमी आहेत. जखमींना उपचारांसाठी स्थानिक रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे.

मल्हारगडावरून शिवज्योत घेऊन काही शिवभक्त एका खासगी टेम्पोने लोणावळ्यामधील शिलाटणे येथे निघाले होते. यावेळी टेम्पो बंगळुरू-मुंबई बायपासवर ताथवडे गावाजवळ पोहोचला असताना मागून कंटेनरने धडक दिली. यामुळे भीषण अपघात झाला. या अपघातात ३० ते ३५ जण जखमी झाले असून त्यापैकी १० जणांची प्रकृती गंभीर आहे. तर, उर्वरित किरकोळ जखमी आहेत. पोलिसांनी याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी कंटेनरचालकाला ताब्यात घेतले आहे. दरम्यान, हा अपघात कसा झाला याबाबत सखोल चौकशी सुरू आहे.

हेही वाचा -सामान्य शिवभक्तांसाठी छत्रपती संभाजी महाराज आक्रमक, रांगेत उभं राहून केलं भाषण