पाथर्डी घाटात एसटी बसचा भीषण अपघात, ११ प्रवासी जखमी

बुलडाणा जिल्ह्यातील पाथर्डी घाटात एसटी बसचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात ११ प्रवासी जखमी झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मेहकरवरून खामगावकडे जात असलेल्या बसच्या पाथर्डीच्या घाटामध्ये अपघात झाला. त्यावेळी बस एका रस्त्याकडील झाडाला धडकली. या बसच्या समोरील भागाचा चेंदामेंदा झाल्याचे दिसत आहे.

या घटनेची माहिती स्थानिकांनी मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सुदैवाने या घटनेत कोणत्याही प्रकारची जिवीतहानी झाली नाही. घटनास्थळी पोलीस आणि अॅम्बुलन्सही पोहोचली असून मदतकार्य करण्यास सुरूवात झाली आहे. त्याचप्रमाणे गंभीर जखमींना रुग्णालयात नेण्यात येत आहे.


हेही वाचा : BMC Budget 2023 : मुख्यमंत्री शिंदे- फडणवीसांची छाप असलेलं अन् मुंबई पालिकेचा करवाढ नसलेलं बजेट