घरमहाराष्ट्रट्रेलर दुकानात घुसला

ट्रेलर दुकानात घुसला

Subscribe

अवजड कॉईलची वाहतूक करणारा ट्रेलर येथे एका दुकानात घुसला. ही घटना मंगळवारी पहाटे पावणेपाच वाजता घडली. अन्य वेळेत हा प्रकार घडला असता तर मोठा अनर्थ ओढावण्याची शक्यता होती.दिघी बंदरातून माणगावच्या पॉस्को कंपनीत अवजड कॉईलची वाहतूक सुरू असते. ही वाहतूक धोकादायक असल्याकडे वारंवार लक्ष वेधूनही कोणतीच उपाययोजना केली जात नसल्याने हा प्रकार घडला.

काहीशा वेगात असलेला हा ट्रेलर (एमएच 46 बीएफ 5319) चालकाचे नियंत्रण सुटल्याने नवानगर येथे मुख्य रस्त्याला लागून असलेल्या इमारतीतील गाळ्यात घुसला. यात कोणासही इजा झाली नाही. अपघात घडला तेव्हा मोठा आवाज झाल्याने भयभीत झालेले नागरिक घराबाहेर पडल्याचे प्रत्यक्षदर्शी नविद जंजीरकर यांनी सांगितले. घटनेनंतर चालकाने तेथून पळ काढला. या अपघातामुळे भल्या पहाटे वाहतूक कोंडीचा अनुभव म्हसळेकरांसह वाहनचालकांना घ्यावा लागला. दरम्यान, दिघी बंदराचा एकही ट्रेलर किंवा टँकर शहरातून जाऊ न देण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते मुसद्दिक इमानदार यांनी दिला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -