घरमहाराष्ट्रनाशिकभऊर-विठेवाडी रस्त्यावर भीषण अपघात; युवक ठार

भऊर-विठेवाडी रस्त्यावर भीषण अपघात; युवक ठार

Subscribe

घाणेगाव व मानूर येथे शोककळा पसरली असून परिसरात हळहळ

बाबा पवार : देवळा

कळवण तालुक्यातील मानूर येथे बहिणीला भेटण्यासाठी जात असलेल्या घाणेगाव येथील भावाच्या दुचाकीला भीषण अपघात होऊन त्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

- Advertisement -

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि.३) घाणेगाव (ता. मालेगाव) येथील सोमनाथ राजेंद्र मोरे (वय ३२) हा तरुण मानूर तालुका कळवण येथील बहिणीला भेटण्यासाठी दुचाकी (एमएच १९ डीएच ५०६७) वरून जात असताना सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास विठेवाडी-भऊर दरम्यान असलेल्या शिवनाला परिसरातील वळणावर एका अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे घाणेगाव व मानूर येथे शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याबाबत पोलीस निरीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश सोनवणे व हवालदार परशराम जाधव हे अधिक तपास करीत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -