मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर माणसाला चिरडले,अपघात सीसीटीव्हीत कैद

Almost half of accident fatalities in Mumbai involve two-wheelers: Report

राष्ट्रीय महामार्गावर पालघर जील्हातील चारोटी गावच्या हद्दीत एक व्यक्ती रस्ता ओलांडत असताना त्याचा भीषण अपघात झाला आहे. अपघाताचा थरार सीसीटिव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. आपण पाहतोय की एक मद्यधुंद व्यक्ती रस्ता ओलांडण्याचा प्रयत्नात असताना त्याला एका वाहनाची धडक बसली आणि धडक बसल्यानंतर सदर व्यक्ती महामार्गाच्या मधोमध पडली असून त्याच्या अंगावरून भरधाव येणारी वाहने त्याला चेंगरून पुढे चालली आहेत. नुकताच पाऊस पडून गेल्यामुळे रस्त्या दिसत नाही त्यातच रस्त्यावरील व्यक्ती न दिसल्यामुळे वाहने त्याला चेंगरून पुढे गेल्याचे निदर्शनास येत आहे.

सदर घटनेची माहिती मिळताच चारोटी महामार्ग व कासा पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी वाहतूक थांबवून सदर व्यक्तीचे शव कासा येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवले. त्यांनतर मयत व्यक्तीच्या मोबाईल सिम कार्ड व नंबर काढून नातेवाईकांना घटनेची माहिती देण्यात आली आहे.