घरताज्या घडामोडीमुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात

Subscribe

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वाहनांचा अपघात दोन जण जखमी तर एकाची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील ओझर्डे गावाजवळ शुक्रवारी सकाळी सहा वाजताच्या सुमारास दूध वाहतूक करणारा टेम्पो आणि कंटेनर या वाहनांचा भीषण अपघात झाला. अपघातामध्ये टेम्पोमधील दोघे जण जखमी झाले असून एकाची प्रकृती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे. अपघातामुळे काही वेळासाठी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.

प्राप्त झालेल्या माहितीनुसार, मुंबई-पुणे वेवर मोठी दुर्दैवी घटना घडली असून या अपघातातील जखमींची परिस्थिती चिंताजनक असल्याचे बोलले जात आहे. दूध वाहतूक करणाऱ्या पीक अप टेम्पोने भरधाव कंटेनरला मागून जोरदार धडक दिली. यात टेम्पोचा चालक आणि त्याच्यासोबत असलेला आणखी एक जण जखमी झाला. चालक गंभीर जखमी झाला आहे. अपघाताच्या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. आणि जखमींना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, पोलिसांनी त्वरीत एक्स्प्रेस वेवरून अपघातग्रस्त वाहन हटवून वाहतूक कोंडी सोडविली. त्यामुळे जास्त वाहतूक कोंडी झाली नाही. आता पुण्याकडील वाहतूक सुरळीत सुरू आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -