घरमहाराष्ट्र२७० रुपयांचा टोल प्रवाशांच्या मुळावर

२७० रुपयांचा टोल प्रवाशांच्या मुळावर

Subscribe

ड्रायव्हरच्या शॉर्टकटने घेतले ५ बळी

मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी पहाटे झालेल्या खासगी बसच्या अपघाताला बस चालक बद्रीनाथ पोपट गोसावी हाच जबाबदार असून, टोलचे 270 रुपये वाचविण्यासाठी मारलेला शॉर्टकट 5 जणांचे बळी आणि त्याच्यासह ४१ जणांना जखमी करणारा ठरला.

कराडहून मुंबईकडे निघालेल्या बसचा प्रवास बोरघाट सोडल्यानंतर गारमाळ जवळ झालेल्या अपघाताने वाटेतच थांबला. खंडाळा सोडल्यानंतर खालापूर टोल नाक्याचे २७० रूपये वाचविण्यासाठी अनेक मोठी वाहने खोपोली बाह्यमार्गाचा पर्याय निवडतात. तीव्र उताराचा आणि वळणावळणाचा रस्ता धोकादायक असल्याने केवळ हलकी वाहने या मार्गाचा वापर करतात. परंतु रात्रीच्या वेळी मोठी वाहने अगदी पहाटेपर्यंत या मार्गाचा वापर बिनधोकपणे करत असतात.

- Advertisement -

खासगी प्रवाशांची खच्चून भरून वाहतूक करताना मामुली टोलसाठी धोकादायक मार्गाचा वापर अतिशय जीवघेणा ठरत असतानादेखील त्याचा वापर केला जातो. या मार्गावर बॅरिकेड्स लावून अवजड, तसेच मोठ्या वाहनांना बंदी घालण्याची मागणी

अपघातानंतर मदतीसाठी धावून गेलो. बसची अवस्था अतिशय वाईट होती. बसची आसने उखडून गेली होती. मंगळवारी पुन्हा सकाळी एक ट्रक याच वळणावर अपघातग्रस्त झाला. सुदैवाने तो झाडाला अडकला अन्यथा खोल दरीत कोसळला असता. -दत्ता शेडगे, गारमाळ ग्रामस्थ

- Advertisement -

या अपघाताला बस चालकासह वाहतूक पोलीस यंत्रणा, परिवहन विभाग जबाबदार आहे. शेकडो किलोमीटर अंतराची प्रवासी वाहतूक करणार्‍या बसचे टायर पूर्णतः गोटा झालेले आहेत. आसने खिळखिळी झालेली आहेत. यावरून अशा खासगी बसना प्रवासी वाहतुकीसाठी परवानगी कशी मिळते?  -अमोलराजे बांदल-पाटील, रस्ता सुरक्षा अभियान सदस्य,दिलासा फाऊंडेशन

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -