घरमहाराष्ट्रपुणे महामार्गावर अपघात; एक जण ठार

पुणे महामार्गावर अपघात; एक जण ठार

Subscribe

पुणे महामार्गावर भीषण अपघात झाला असून या अपघातात एक महिला ठार झाल्याची माहिती समोर आली आहे.

पुणे महामार्गावर मंगळवारी रात्री भीषण अपघात झाला झाल्याची घटना घडली. या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. हौसाबाई बबन हारदे (४५) असे या महिलेचे नाव आहे.

असा घडला अपघात

मांढरदेवीच्या दर्शनासाठी खेड पुणे येथे राहणाऱ्या मैनाबाई दिलीप ठाकर (४०) आणि हौसाबाई बबन हारदे (४५) या दोघी निघाल्या होत्या. त्या वाई मार्गे सुरुर तालिका वाई येथील धावजी पाटील मंदिरात देव दर्शन उरकून रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास पुन्हा पुण्याला जाण्यासाठी दोघीही निघाल्या. दरम्यान, पुणे सातारा महामार्ग ओलांडून सातारा पुणे महामार्गावरील तीन लेन वर आल्या असता पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या मालवाहून नेणाऱ्या ट्रकने हौसाबाई यांना जोराची धडक दिली. त्यात त्या २० ते २५ फूट उंच उडाल्या आणि पुन्हा महामार्गावर आदळल्या. त्यांच्या डोक्याला जबर मार बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, या घटनेची माहिती निर्मला पवार यांनी भुईंज पोलीस ठाण्याला दिली. या अपघाताची माहिती हवालदार चंद्रकांत मुंगसे यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत त्याठिकाणी दाखल झाले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेत त्यांनी शवविच्छेदनासाठी कवठे प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवून मालट्रक आणि चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या अपघाताची नोद भुईंज पोलीस ठाण्यात झाली असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -