HomeमहामुंबईपालघरAccident: अजमेर शरीफ दर्ग्यावरून येताना भीषण अपघात,तिघा तरूणांचा मृत्यू

Accident: अजमेर शरीफ दर्ग्यावरून येताना भीषण अपघात,तिघा तरूणांचा मृत्यू

Subscribe

गुजरात राज्यात अंकलेश्वर भागात पहाटेच्या सुमारास मागून भरधाव येणाऱ्या ट्रकने कारला धडक दिली.यामुळे कार पुढच्या गाडीचा धडकून दोन्ही गाड्यांच्यामध्ये येऊन भीषण अपघात झाला होता.

मनोर : राजस्थान राज्यातील अजमेर शरीफ दर्गा येथून येताना परतीच्या प्रवास करतेवेळी गुजरात राज्यातील भरूच अंकलेश्वर भागात बुधवारी (ता.08)पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघात झाला.या अपघातात पालघर तालुक्यातील तीन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.आयान बाबा चोगले (रा. मनोर), ताहीर नासिर शेख (रा. पालघर) आणि मुदस्सर अन्सार पटेल (रा. टाकवहाल) यांचा या अपघातात मृत्यू झाला तर सलमान अल्ताफ शेख,शाहरुख सलीम शेख,शादाब मलिक शेख आणि मोईन सलीम शेख सर्व (रा. काटाळे)हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर भरूच परिसरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.(Accident: Three youths died in a terrible accident while coming from Ajmer Sharif Dargah )

गुजरात राज्यात अंकलेश्वर भागात पहाटेच्या सुमारास मागून भरधाव येणाऱ्या ट्रकने कारला धडक दिली.यामुळे कार पुढच्या गाडीचा धडकून दोन्ही गाड्यांच्यामध्ये येऊन भीषण अपघात झाला होता. अपघातग्रस्त कारचा चक्काचूर झाला आहे. अपघाताची माहिती कळताच मनोर, टाकवाहाल, काटेला आणि पालघर शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.


Edited By Roshan Chinchwalkar