घरताज्या घडामोडीसोलापूर-पुणे राष्ट्रीय मार्गावर भीषण अपघात; ३ जण ठार, १० जण जखमी

सोलापूर-पुणे राष्ट्रीय मार्गावर भीषण अपघात; ३ जण ठार, १० जण जखमी

Subscribe

पुण्यावरुन हैदराबादकडे जात असताना रुग्णवाहिकेने एका माल वाहतूक ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने अपघात झाला आहे. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील मोहोळजवळ एका रुग्णावाहिकेला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात रुग्णवाहिकेमधील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून यामध्ये दहा जण जखमी झाले आहेत. पुण्यावरुन हैदराबादकडे जात असताना रुग्णवाहिकेने एका माल वाहतूक ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली आणि अपघात झाला.

नेमके काय घडले?

रोजगारासाठी पुण्यात स्थायिक झालेल्या राठोड कुटुंबीयांतील एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याने त्यांचा मृतदेह हैदराबाद येथे त्यांच्या मूळगावी घेऊन जात होते. सोलापूरपासून ३५ किलोमीटर अंतरावर मोहोळ येथे शववाहिका समोरील एका माल वाहतूक ट्रकला पाठीमागून जोरदार आदळली आणि हा अपघात घडला. शनिवारी पहाटे पावणेचारच्या सुमारास ही दुर्घटना घडली. या अपघातात ३५ वर्षाच्या शववाहिका चालकाचा मृत्यू झाला असून त्याचे नाव अजून समजू शकले नाही. रवी माणिक राठोड (३८) आणि बुद्धीबाई चन्नापागूल (४५) अशी अन्य दोघा मृतांची नावे आहेत.

- Advertisement -

मूळचे हैदराबाद येथे राहणारे राठोड कुटुंबिय उदरनिर्वाहासाठी पुण्यात वारजे माळेवाडी येथे राहतात. त्यांच्या घरातील एका पुरूषाचा अचानकपणे मृत्यू झाल्याने त्याचा अंत्यविधी मूळगावी उरकण्यासाठी मृतदेह शववाहिकेतून हैदराबादकडे नेण्यात येत होते. शववाहिकेत, मृतदेहाजवळ शोकाकूल राठोड कुटुंबियांसह निकटचे काहीजण बसले होते. मध्यरात्री शववाहिका मृतदेह घेऊन पुण्याहून निघाली होती. पहाटे मोहोळजवळ आल्यानंतर समोरील एका वाहनाला शववाहिका अचानकपणे आदळली. शववाहिका चालकाला पहाटे डुलकी लागल्यामुळे त्याचा वाहनावरील ताबा सुटला आणि हा अपघात घडला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.


हेही वाचा – ‘जुनी थडगी काढू नका, तुमचेच सांगाडे सापडतील’

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -