बाळासाहेबांच्या पक्षघटनेनुसारच शिंदेंना नेतेपद, राहुल शेवाळेंचे स्पष्टीकरण

rahul shewale

मुंबई – शिवसेना पक्ष आणि चिन्हावरून सुरू असलेला वाद निवडणूक आयोगाकडे प्रलंबित आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेबांची शिवसेना या दोन्ही गटांनी त्यांचा लेखी युक्तीवाद सादर केला आहे. दरम्यान, या दोन्हींच्याही युक्तीवादात शिवसेनेच्या घटनेबाबत उल्लेख करण्यात आला आहे. उद्धव ठाकरेंच्या कार्यकाळात बाळासाहेबांनी पक्षाची तयार केलेली घटना बदलण्यात आली. बाळासाहेबांच्या मूळ घटनेनुसार एकनाथ शिंदेंना यांना मुख्य नेतेपद देण्यात आले आहे, असं शिंदे गटातील खासदार राहुल शेवाळे यांनी म्हटलंय. आज त्यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

एकनाथ शिंदे यांना दिलेले मुख्य नेतेपद घटनाबाह्य आहे, असा दावा ठाकरे गटाकडून करण्यात आला होता. त्यावर प्रतित्युर म्हणून शिंदे गटानेही लेखी युक्तीवाद केला आहे. बाळासाहेबांच्या घटनेनुसारच एकनाथ शिंदे यांना मुख्यनेतेपद देण्यात आले आहे. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांची घटना बदलली, असं राहुल शेवाळे म्हणाले.

पक्षचिन्ह आम्हालाच मिळणार

पक्षचिन्हबाबात त्यांना विचारले असता ते म्हणाले की पक्षचिन्ह आम्हालाच मिळणार. कारण, पक्षाची मान्यता मतदानावर अवलंबून असते. लोकप्रतिनिधी ज्यांच्याकडे जास्त त्यांचं मतदान गृहित धरलं जातं. त्यानुसार, आमच्याकडे सर्वाधिक लोकप्रतिनिधी आहेत. त्यामुळे पक्षचिन्ह आम्हालाच मिळणार, असंही त्यांनी स्पष्ट केलं.