Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश Lok Sabha Survey : देशात सद्यपरिस्थितीत लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर 'असा' असेल...

Lok Sabha Survey : देशात सद्यपरिस्थितीत लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर ‘असा’ असेल निकाल

Subscribe

सध्या लोकसभेत देखील एनडीए सरकारचाच डंका असल्याचे पाहायला मिळत आहे. परंतु आगामी काळामध्ये एनडीए सरकारचा हा धबधबा कायम राहणार आहे की नाही? याबाबतची महत्त्वाची माहिती आता समोर आलेली आहे.

नवी दिल्ली : ज्याप्रमाणे राज्यातील राजकारणात बदल झालेला आहे. त्याचप्रमाणे देशातील राजकारणात सुद्धा मोठा बदल झालेला आहे. सध्या देशामध्ये भाजप हा सर्वात मोठा पक्ष असल्याने या पक्षाचे वजन भारताच्या राजकारणात सर्वाधिक आहे. ज्यामुळे इतर काही लहान पक्ष हे भाजपला पाठिंबा देत असल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या लोकसभेत देखील एनडीए सरकारचाच डंका असल्याचे पाहायला मिळत आहे. परंतु आगामी काळामध्ये एनडीए सरकारचा हा धबधबा कायम राहणार आहे की नाही? याबाबतची महत्त्वाची माहिती आता समोर आलेली आहे. इंडिया टुडे सी वोटरने केलेल्या सर्व्हेबाबतची माहिती आता जाहीर करण्यात आलेली असून त्यामुळे जर का आजच्या परिस्थितीमध्ये लोकसभेच्या निवडणुका घेतल्या गेल्या तर पुन्हा एकदा मोदी सरकार येण्याची शक्यता या सर्व्हेच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आलेली आहे. (According to India Today C Voter’s survey, Modi’s government is again in the country)

हेही वाचा – …आता सरकार तोंडावर पडले, ‘त्या’ प्रकरणावरून संजय राऊतांची टीका

- Advertisement -

इंडिया टुडे सी वोटर ने केलेल्या सर्व्हेनुसार, आज जर का देशामध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर भाजपला सर्वाधिक जागा मिळू शकतात. ज्यामुळे पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांचीच सत्ता येऊ शकते. तर सध्याच्या विरोधकांच्या आघाडीला म्हणजेच इंडियाला याचा फायदा होत नसला तरी विरोधकांच्या आघाडीच्या देखील 200 जवळपास सीट लोकसभेमध्ये निवडून येऊ शकतात. त्यामुळे सत्ताधाऱ्यांची भविष्यात डोकेदुखी वाढू शकते, असे या सर्व्हेच्या माध्यमातून समोर आलेले आहे.

या सर्व्हेनुसार, आज जर निवडणुका झाल्या तर NDAला 306 जागा आणि INDIA आघाडीला 193 जागा मिळू शकतात. तर अपक्षांना 44 जाहा मिळतील. तसेच जर का आपण पक्षानुसार पाहिले तर भाजपला 287, काँग्रेसला फक्त 74 आणि इतर पक्षांच्या मिळून 182 जागा निवडून येऊ शकतात. त्यामुळे काँग्रेसला साधा 100 चा आकडाही आज निवडणुका घेण्यात आल्या तर गाठता येणार नसल्याचे या सर्व्हेच्या माध्यमातून स्पष्ट झाले आहे.

- Advertisement -

या सर्व्हेमध्ये राज्यानुसार देखील माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार, आज जर का महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर याचा सर्वात मोठा फटका हा शिवसेनेला म्हणजेच शिंदे गटाला बसू शकतो. तर यामुळे महायुती देखील पिछाडीवर राहू शकते. कारण इंडिया टुडे सी व्होटरने जाहिर केल्याप्रमाणे सर्व्हेच्या आकडेवारीप्रमाणे, महायुतीला 20 तर महाविकास आघाडीला 28 जागा मिळू शकतात.

राज्यात झालेल्या फोडाफोडीच्या राजकारणामुळे मतदार चांगलेच वैतागले असल्याचे या सर्व्हेच्या माध्यमातून समोर आले आहे. 2022 मध्ये शिवसेना आणि आता 2023 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडल्याने सामान्य नागरिक संतापला आहे. सत्तेच्या हव्यासापोटी आमदार, खासदार फोडण्यात येत असल्याचा राग नागरिकांच्या मनात आहे. त्यामुळे या सर्व्हेवर देखील त्याचा परिणाम दिसून आला असून जर का आज राज्यात लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर शिंदे गट आणि अजित पवार गटाला एकत्रित 5 जागा मिळू शकतात. तर ठाकरे गटाला आणि शरद पवार गटाला एकत्रित मिळून 18 जागा मिळू शकतात. परंतु भाजपला सर्वाधिक अशा 15 जागा आणि काँग्रेसला त्याखालोखाल 10 जागा मिळतील, असे या सर्व्हेतून सांगण्यात आले आहे.

- Advertisment -