शेतकऱ्यांचे 40 कोटी कुठे गेले?, मुश्रीफ आणि समरजितसिंह घाटगेंमध्ये आरोप-प्रत्यारोप

There is no action against Hasan Mushrif's children at present

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ आणि समरजितसिंह घाटगे यांच्यात मागील काही दिवसांपासून शाब्दिक चकमक सुरू आहे. तसेच 40 हजार शेतकऱ्यांचे चाळीस कोटी कुठे गेले, यावरून मुश्रीफ आणि समरजितसिंह घाटगेंमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. मुश्रीफ साहेब 40 हजार शेतकऱ्यांचे चाळीस कोटी कुठे गेले. मुश्रीफ साहेबांनी शेतकऱ्यांना खोट्या पावत्या दिल्या. कारखान्यासाठी हा पैसा गोळा करण्यात आला होता, असा आरोप समरजितसिंह घाटगे यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर केला होता. दरम्यान, या आरोपानंतर हसन मुश्रीफ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

हसन मुश्रीफ यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, सरसेनापती संताजी घोरपडे कारखाना आणि शाहू दूध संघाबद्दल समरजित घाटगे यांनी केलेली विधानं दिशाभूल करणारी आहे. तसेच लोकांच्या मनात गैरसमज पसरवला जात आहे. मुरगुड पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलेल्या गुन्ह्यात मला अडकवून टाकण्याच्या इराद्यामुळे त्यांचा हेतू स्पष्ट होतो, असं हसन मुश्रीफ म्हणाले.

आम्हाला सहकारी साखर कारखाना उभा करायचा होता. परंतु, सरकारने सहकारी साखर कारखान्याला बंदी घातली होती. तसेच शासकीय थक कमी न देण्याचाही निर्णय सरकारने घेतल्याने आम्हाला खासगी कारखाना उभा करावा लागला, असं हसन मुश्रीफ म्हणाले.

40 हजार लोकांचे पैसे आणि पाच राष्ट्रीयकृत बँकांचे कर्ज असे पैसे गोळा करून माझ्या मुलांनी हा साखर कारखाना उभा केला आहे. अवघ्या काही दिवसात 40 हजार शेतकरी 40 कोटी रुपये साखर कारखाने उभारण्यासाठी देऊ शकतात, यावरून आमची विश्वासार्हता किती आहे हे स्पष्ट होते, असंही मुश्रीफ म्हणाले.


हेही वाचा : भाजप आणि ओवैसी म्हणजे राम आणि श्यामची जोडी, संजय राऊतांचा