मुंबई : तलाठी भरती परीक्षा गैरप्रकरणात पोलिसांनी अटक केलेला गणेश घुशिंगे हा म्हाडा भरती परीक्षा गैरप्रकरणातील ही संशयित आरोपी आहे. म्हाडा परीक्षेच्या निवड यादीत गणेश घुशिंगे हा प्रथम आला होता. या प्रकरणी टीसीएसने गणेश घुशिंगेला दोषी ठरविले आणि खेरवाडी पोलीस ठाण्यात गणेशविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डिसेंबर 2021 मध्ये म्हाडाच्या 565 रिक्त पदांच्या भरतीसाठी परीक्षा होणार होत्या. या परीक्षेच्या काही तास आधी गैरप्रकार झाल्याने परीक्षा रद्द करण्यात आली. यानंतर म्हाडाने टीसीएसच्या माध्यमातून जानेवारी-फेब्रुवाीर 2022 मध्ये ऑनलाईन परीक्षा घेतली. या परीक्षेत गैरप्रकार झाल्याचा आरोप स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने केला होता. कारण, मराठवाड्यातील परीक्षा केंद्रावर बोगस उमेदवारांना परीक्षेत बसविण्यात आल्याचे आले. पण समितीने पुरावे दिल्यानंतर ही म्हाडाने आरोप फेटाळून लावले होते. यानंतर टीसीएसच्या चौकशी अहवालामध्ये म्हाडाच्या निवड यातीली प्रथम आलेले 60 परीक्षार्थी दोषी आढळून आले आणि या 60 जणांची निवड रद्द करून केरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या 60 जणांच्या यातीद गणेश घुशिंगेचा समावेशो होता आणि आता गणेश घुशिंगेला तलाठी परीक्षा गैरप्रकरणात पोलिसांनी अटक केले आहे.
हेही वाचा – तलाठी भरती परिक्षा गैरप्रकरणामध्ये संभाजीनगरची लिंक काय ?
म्हाडा भरती परीक्षेत गणेश घुशिंगे हा प्रथम आला होता. पण गणेश हा या परीक्षेत डमी उमेदवार म्हणून बसला होता. यानंतर गणेशची चौकशी करण्यात आली होती. तेव्हा गणेशचा जबाब नोंदविला आणि त्याला नोटीस देऊन सोडण्यात आले. यानतंर तलाठी भरती गैरप्रकरणात पोलिसांनी त्याला अटक करण्यात आली. गणेशला 22 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
हेही वाचा – तलाठी भरती परीक्षेत हायटेक कॉपी; ‘काय’ आहे संपूर्ण प्रकरण?
तलाठी ग्रुप सी पदाची परीक्षा १७ ऑगस्ट ते १४ सप्टेंबरदरम्यान होणार होती. राज्यात तलाठी पदाच्या ४ हजार ४६६ रिक्त जागा भरल्या जाणार होत्या. यासाठी ११ लाख १० हजार ५३ उमेदवारांनी नोंदणी झालेली आहे. त्यामुळे या परीक्षेचा निकालदेखील अटीतटीचा असेल. तलाठी भरतीला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होत्या. इच्छूक उमेदवार अनेक दिवसांपासून परीक्षेच्या तारखा जाहीर होण्याची वाट पाहत होते. परंतु, अशा पेपरफुटीच्या शक्यता परीक्षार्थींनी निदर्शनास आणून दिलेली असतानाही सरकारी पातळीवरून फारशी खबरदारी घेतली गेली नसल्याचे या प्रकारावरुन समोर आले.