घरक्राइमउमेश कोल्हे हत्या प्रकरणातील आरोपीवर कारागृहात हल्ला

उमेश कोल्हे हत्या प्रकरणातील आरोपीवर कारागृहात हल्ला

Subscribe

अमरावतीमधील औषध विक्रेता उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी शाहरुख पठाणला पोलीसांनी अटक केली होती. या आरोपी बाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. उमेश कोल्हे यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी शाहरुख पठाणवर मुंबईतील आर्थर रोड कारागृहात हल्ला झाला आहे. पाच कैद्यांकडून त्याला मारहाण करण्यात आली आहे.

या घटनेमुळे संपूर्ण कारागृहात खळबळ उडाली असून कारागृहातील सुरक्षा वाढवण्यात आल्याची माहिती आहे. भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपुर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर त्यांचे समर्थन करणारी पोस्ट उमेश यांनी व्हॉटसअॅपवर फॉरवर्ड केली होती. यामुळे रागातून कट रचून त्यांची हत्या करण्यात आली, असा संशय आहे

- Advertisement -

काय आहे प्रकरण –

उमेश हे 21 जूनला रात्री आपल्या दुकानातून घरी परतत होते. त्यावेळी अमरावतीतल्या घंटाघर परिसरात त्यांची हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी हत्येच्या कटाचा कथित सूत्रधार शेख इरफान शेख रहिम, मुदस्सर अहमद (वय 22), शाहरुख पठाण (वय 27), अब्दुल तौफिक (वय 24) शोएब खान (वय 22) व युसुफ खान (वय 32) या सात जणांना अटक केली आहे.

- Advertisement -

राजस्थानमधील उदयपूरमध्ये नुपुर शर्माच्या वक्तव्याचे समर्थन करणाऱ्या एका शिंप्याची हत्या झाली होती. यानंतर त्या प्रकरणाचा तपास एनआयए करत होती. त्यामुळे उमेश यांच्या हत्येचा तपास एनआयएने आपल्याकडे घेतला आणि सर्व सात आरोपींविरोधात बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायद्यासह (युएपीए) अन्य कायद्यांतील कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -