ग्रामपंचायत उमेदवारांना शासनाचा दिलासा; जात प्रमाणपत्र पडताळणीबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय

maharshtra Gram Panchayat elections grampanchayat election candidates can submit cost account through True Voter app

ग्रामपंचायत उमेदवारांना राज्य शासनाने मोठा दिलासा दिला आहे. ग्रामपंचायत उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र विहित मुदतीत निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे दाखल केलेलं आहे, त्यांना छाननीपूर्वी जात प्रमाणपत्र पडताळणीची पोचपावती निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे दाखल करता येणार आहे. राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यभरात जात प्रमाणपत्र पडताळणीचे अर्ज दाखल करण्यासाठी जात प्रमाणपत्र पडताळणी केंद्रावर ग्रामपंचायत उमेदवारांची झुंबड उडाली. जात प्रमाणपत्र पडताळणीच्या अर्जाचे प्रमाण वाढल्याने ऑनलाईन सेवेवर ताण पडला. त्यामुळे पोचपावती रात्री उशिरा मिळाल्याने ती पावती नामनिर्देशन पत्रासोबत दाखल करता आलं नव्हतं. यासाठी राज्य शासनाने हा निर्णय घेतला आहे.

जात प्रमाणपत्र पडताळणीचे अर्ज ऑनलाईन दाखल होऊ न शकल्याने शासनाच्या सामाजिक न्याय विभागाने २९ डिसेंबरला संध्याकाळपासून ऑफलाईन अरज स्वीकारायला सुरुवात केली. यामुळे मध्यरात्रीपर्यंत काम सुरु होतं. यामुळे पोचपावती रात्री उशिरा मिळाल्याने ती पावती नामनिर्देशन पत्रासोबत दाखल करता आलं नव्हतं. आरक्षित जागांवरील इच्छुक उमेदवारांना न्याय मिळावा या दृष्टीकोनातून ज्या उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र विहित मुदतीत निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे दाखल केलेलं आहे, केवळ त्यांना छाननीपूर्वी जात प्रमाणपत्र पडताळणीची पोचपावती निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे दाखल करता येईल, असा आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिला आहे.