बंडखोरांवर कारवाई, तर निष्ठावंताचे शिवसेनेकडून कौतुक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेल्या शिवसेनेच्या आमदारांनी बंड पुकारल्यानंतर शिवसेनेकडून बंडखोरांवर कारावाई केली जात आहे. बंड पुकारलेल्या अनेक आमदारांची पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे.

uddhav thackeray

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेल्या शिवसेनेच्या आमदारांनी बंड पुकारल्यानंतर शिवसेनेकडून बंडखोरांवर कारावाई केली जात आहे. बंड पुकारलेल्या अनेक आमदारांची पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बैठका घेत असून, या बैठकीत याबाबत निर्णय घेत आहेत. मात्र, एकिकडे बंडखोरांवर कारवाई केली जातेय, तर दुसरीकडे निष्ठावंतांचे शिवसेनेकडून कौतुक केले जात आहे. शिवसेनेचे कोकणातील आमदार वैभव नाईक यांचे उद्धव ठाकरे यांनी पत्राच्या माध्यमातून कौतुक केले आहे. त्यामुळे आता शिवसेनेत खरे आमदार कोणते, यावरून नव्या वादाला सुरूवात झाली आहे.

हिंगोलीचे बंडखोर आमदार संतोष बांगर यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षाविरोधी कारवायाचा ठपका ठेवत त्यांची शिवसेनेमधून हाकालपट्टी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर आमदार संतोष बांगर हे शिवसेनेसोबतच होते. शिंदेंच्या बंडाच्या पहिल्या दिवसापासून ते शिवसेनेच्या बाजूने बंडखोरांवर हल्लाबोल करत होते. तसेच, बंडखोर आमदारांनी पुन्हा शिवसेनेत यावे, असे आवाहान देखील त्यांनी केले होते. शिवाय, आमदारांचा चांगलाच समाचार घेतला होता. बंडखोर आमदारांच्या बायका तरी त्यांच्यावर विश्वास ठेवतील का, असा सवाल त्यांनी केला होता. त्यांच्या बायकांना देखील असेच वाटत असेल की, आज याने ज्या पक्षाच्या जीवावर मोठा झाला त्या पक्षाला सोडले, मला तर कधीही सोडू शकतो अशी घणाघाती टीका त्यांनी केली होती.

संतोष बांगर हे बहुमत चाचणीच्या दिवशीच ते एकनाथ शिंदे गटला जाऊन मिळाले. संतोष बांगर यांनी विधानसभा अध्यक्ष निवडीच्यावेळी शिवसेनेच्या बाजुने मतदान केले होते. मात्र दुसऱ्याच दिवशी बहुमत चाचणीच्या अवघ्या काही तास आधी ते शिंदे गटाला येऊन मिळाले. बहुमत चाचणीत त्यांनी शिंदे गटाच्या बाजूने मतदान केले होते. याची गंभीर दखल आता शिवसेनेकडून घेण्यात आली असून, संतोष बांगर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

यावर “मी माझ्या मतदार संघातील लोकांशी चर्चा केली. कार्यकर्त्यांशी चर्चा केली, त्यांचा सल्ला घेतला. सर्वांचे म्हणणे एकच होते की, राज्यात सध्या बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाणारा हिंदुत्त्ववादी विचारांचा मुख्यमंत्री होत आहे. त्यामुळे तुम्ही देखील शिंदे गटात सहभागी व्हा. कार्यकर्त्यांच्या इच्छेमुळे आपण शिंदे गटाला पाठिंबा दिला”, असे संतोष बांगर यांनी म्हटले. तसेच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावल्यास मातोश्रीवर जाऊ असेही बांगर यांनी म्हटल्याने ते चांगलेच चर्चेत आले होते.

दरम्यान, एकिकडे बंडखोरांवर कारवाई केली जातेय, तर दुसरीकडे निष्ठावंतांचे शिवसेनेकडून कौतुक केले जात आहे. शिवसेनेचे कोकणातील आमदार वैभव नाईक यांचे उद्धव ठाकरे यांनी पत्राच्या माध्यमातून कौतुक केले आहे.

Shiv sena


हेही वाचा – पदाची प्रतिष्ठा वाढवणारे राज्यपाल राज्याला मिळाले, शरद पवारांची खोचक टीका