घरठाणेठाण्यात अनधिकृत रेती उत्खनन करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा

ठाण्यात अनधिकृत रेती उत्खनन करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा

Subscribe

ठाणे: मुंब्रा खाडी, कोपर खाडी व भिवंडी लगतच्या खाडीमध्ये गस्तीवर असलेल्या ठाणे व भिवंडी तहसील कार्यालयाच्या पथकाने सोमवारी अनधिकृत रेती उत्खनन करणाऱ्या २ सक्शन पंप आणि २ बार्जवर धडक कारवाई केली. तसेच त्या सक्शन पंप व बार्ज यांच्या इंजिनमध्ये साखर टाकून नष्ट करून पाण्यामध्ये बुडविण्यात आले. तसेच खाडी लगत असलेल्या रेती साठ्यासह ३ कुंड्या नष्ट करण्याची कारवाई केली. या कारवाईमध्ये अंदाजे ५० लाखांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

जानेवारी व फेब्रुवारीमध्ये अनधिकृत रेती उत्खननावर ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत धडक कारवाई करण्यात येत असून मागील तीन आठवड्यामध्ये आठ कारवाया केल्या आहेत. या कारवायांमध्ये ९ बार्ज, ७ सक्शन पंप, २० ब्रास रेतीसाठा, ९ रेतीच्या कुंड्या (हौद) नष्ट करण्यात आले. त्या साहित्याची एकूण किंमत एक कोटी ७२ लाख रुपये आहे. आजही मुंब्रा, कोपर व भिवंडी खाडीलगत कारवाई करून अवैध रेती उत्खनन करणाऱ्या सक्शन पंप व बार्जवर कारवाई करण्यात आली.

- Advertisement -

जिल्हाधिकारी कार्यालयाने ०१ एप्रिल २०२२ ते १३ फेब्रुवारी २०२३ पर्यंत जिल्ह्यांतर्गत अनधिकृत गौण खनिज वाहनांच्या तपासणी मोहिमेदरम्यान ११ हजार ३०७ वाहनांची तपासणी केली असून आजपर्यंत आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये एकूण २०५ वाहनांवर दंडात्मक कारवाई केली आहे. अनधिकृत गौण खनिज वाहन करणाऱ्या ट्रक मालकांकडून ३०१ कोटी ६१ लाख एवढा महसूल वसूल करण्यात आलेला आहे.

अनधिकृत गौण खनिज उत्खनन व वाहन याच्यावर देखरेख ठेवण्याकरिता अद्ययावत “महाखनिज प्रणालीचा” वापर करण्यात येत असून त्याद्वारे छाननी करून अनधिकृत वाहनांवर कारवाई करण्यात येत असल्याचे जिल्हा प्रशासनामार्फत सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

हेही वाचा : मुंबई पालिकेच्या अधिकाऱ्याला धक्काबुक्की, शिवसेनेच्या नगरसेवकाला पोलिसांकडून अटक


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -