घरमहाराष्ट्रसंपकरी कर्मचाऱ्यांवर होणार शिस्तभंगाची कारवाई : प्रशासनाचा इशारा

संपकरी कर्मचाऱ्यांवर होणार शिस्तभंगाची कारवाई : प्रशासनाचा इशारा

Subscribe

त्यामुळे या संपात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या विरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल. केंद्र शासनाचे ‘काम नाही- वेतन नाही’ हे धोरण राज्य शासनही अनुसरत आहे. याबाबत शासनाने आज १३ मार्च २०२३ रोजी परिपत्रक निर्गमित केले आहे. त्याकडे या प्रसिद्धी पत्रकाद्वारे सर्व शासकीय कर्मचाऱ्यांचे लक्ष वेधण्यात येत आहे.

मुंबईः उद्या, १४ मार्च पासूनच्या संपात सहभागी होणाऱ्या शासकीय- निमशासकीय कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा इशारा सामान्य प्रशासन विभागाचे (सामाजिक विकास समन्वय) सचिव सुमंत भांगे यांनी दिला आहे. पत्रक काढून हा इशारा देण्यात आला आहे.

राज्य शासकीय कर्मचारी त्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटना व राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना यांनी १४ मार्च २०२३ पासून राज्यव्यापी बेमुदत संप करण्याची नोटीस शासनास दिली आहे. या संपात राज्यातील राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र, राज्य सरकारी- निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समिती, महाराष्ट्र या संघटना सहभागी आहेत. या संपामध्ये राज्य शासकीय- निमशासकीय कर्मचारी सामील होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही भांगे यांनी जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.

- Advertisement -

महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ मधील नियम ६ च्या तरतुदीनुसार महाराष्ट्र राज्य शासकीय- निमशासकीय कर्मचारी यांच्या संघटनेने पुकारलेला हा संप बेकायदेशीर ठरतो. त्यामुळे या संपात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या विरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल. केंद्र शासनाचे ‘काम नाही- वेतन नाही’ हे धोरण राज्य शासनही अनुसरत आहे. याबाबत शासनाने आज १३ मार्च २०२३ रोजी परिपत्रक निर्गमित केले आहे. त्याकडे या प्रसिद्धी पत्रकाद्वारे सर्व शासकीय कर्मचाऱ्यांचे लक्ष वेधण्यात येत आहे.

राज्यातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घ्यावा व जनतेची कोणत्याही प्रकारची गैरसोय होवू नये म्हणून शासकीय कामकाज न थांबवता योग्य मार्गाने आपल्या मागण्या शासनापुढे मांडाव्यात, असे आवाहन शासनाने केले आहे, असेही सचिव भांगे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

- Advertisement -

जुन्या पेन्शनासाठी सरकारी व निमसरकारी कर्मचाऱ्यांनी उद्यापसून संप पुकारला आहे. या मागणीसाठी सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला विरोधी पक्षनेते अजित पवार आणि विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे उपस्थित होते. ही बैठक निष्फळ ठरल्याने कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -