घरताज्या घडामोडीजीवनावश्यक वस्तूंची अधिक दरांनी विक्री केल्यास होणार कारवाई

जीवनावश्यक वस्तूंची अधिक दरांनी विक्री केल्यास होणार कारवाई

Subscribe

जीवनावश्यक वस्तूंची अधिक दरांनी विक्री केल्यास आता त्यांच्यावर धडक कारवाई केली जाणार आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर सगळीकडे खबरदारी घेतली जात असून शासकीय आदेशाचे तंतोतंत पालन करणे गरजेचे आहे. नागरिकांना अत्यावश्यक सेवा देणे गरजेचे असल्याने भाजीपाला, दूध, धान्य, फळे, औषधे आदी जीवनावश्यक वस्तू देण्यासाठी प्रशासनाने शिथिलता ठेवली असून काही ठिकाणी जास्त दराने भाजीपाला किराणामाल आदी वस्तुंची विक्री केली जात असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. अशा तक्रारी आढळून आल्यास त्यांच्यावर तात्काळ कारवाई केली जाईल, असे निर्देश प्रांताधिकारी अनिल पवार यांनी दिले.

नगर परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात नगराध्यक्ष अनुराधा आदिक यांच्याशी शहरातील विविध अडचणी संदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी तहसीलदार प्रशांत पाटील, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. वसंत जमधडे, गट विकास अधिकारी जालिंदर आभाळे, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्रीहरी बहिरट, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मोहन शिंदे, पालिकेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश जाधव, आरोग्य अधिकारी संजय आरणे, अतिक्रमण अधिकारी संजय शेळके, नगरसेवक दीपक चव्हाण, रवी पाटील, अल्तमश पटेल, रईस जाहागीरदार, अर्बन बँकेचे माजी संचालक दिपक दुग्गड, किराणा व्यापारी गौतम उपाध्ये, राकेश न्याती, आदी यावेळी उपस्थित होते.

- Advertisement -

किराणा स्टोअर्स २४ तास सुरु

अत्यावश्यक सेवामध्ये मोडणारे सर्व दुकानांना २४ तास सुरू ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आहेत. शहरातील नागरिकांनी नजीकच्या किराणा दुकानातून माल घ्यावा. तसेच शहरांमध्ये ३२ फळ विक्रेत्यांना पासेस दिले असून त्यांच्यामार्फत शहरांमध्ये रास्त दराने फळ विक्री होणार आहे. फळविक्रेते हे शहरातील प्रत्येक भागामध्ये हात गाडी घेऊन फिरणार आहेत. नागरिकांनी त्यावेळी गर्दी करू नये, एकाएकाने क्रमा-क्रमाने फळे भाजीपाला आदी वस्तू घ्याव्यात. व्यापाऱ्यांनी या कामात सहकार्य करावे. एखाद्या दुकानदाराने किंवा व्यापाऱ्याने आपला माल चढ्या भावाने दिल्यास त्याच्यावर तात्काळ दंडात्मक कारवाई करण्यात येईल.  – अनिल पवार, प्रांताधिकारी

शहरातील फळे भाजीपाला औषधे दूध किराणा सामान यासाठी झोमॅटो सारख्या कंपन्यांकडे वितरण दिले पाहिजे. जेणेकरून शहरातील प्रत्येक भागांमध्ये नागरिकांना कसली गरज भासल्यास त्यांनी संबंधित वितरण करणाऱ्या व्यक्तीला फोन करून ती वस्तू मागून घेता येईल. जेणेकरून गर्दी होणार नाही आणि नागरिकही बाहेर पडणार नाही. शहरातील ठराविकच लोक बाहेर राहतील, अशी संकल्पना नगराध्यक्ष अनुराधा आदीक यांनी मांडली. यावर प्रांताधिकाऱ्यांनी प्रायोगिक तत्त्वावर पाच लोकांना विविध वस्तू वितरण करता येईल, असा निर्णय झाला.

- Advertisement -

हेही वाचा – ‘करोनाची चाचणी करुन घे’, सांगणे पडले महागात


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -