घरताज्या घडामोडीअवाजवी बिल आकारणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई केली जाईल - राजेश टोपे

अवाजवी बिल आकारणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई केली जाईल – राजेश टोपे

Subscribe

आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे औरंगाबाद दौऱ्यावर होते. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जी रुग्णालये कोरोनाच्या काळात अवाजवी बिल आकारत आहेत त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले. तसेच अशा रुग्णालयांवर आपली करडी नजर असल्याचे त्यांनी सांगितले. औरंगाबादमध्ये कोरोना रुग्णांचे प्रमाण घटले आहे. जिल्ह्यात १ लाख कोरोना चाचण्या झाल्या ही चांगली बाब असल्याचे राजेश टोपे यावेळी म्हणाले. औरंगाबादेतला रुग्ण दुप्पटीचा कालावधी १४ वरून २६ दिवसांवर आला आहे, अशी माहिती दिली.

आज औरंगाबादमध्ये कोरोनाची परिस्थितीत काय आहे? हे जाणून घेण्यासाठी औरंगबाद दौऱ्यावर आहे. यावेळी घाटी रुग्णालयाला भेट दिली. तसेच घाटी रुग्णालयातील रिक्त पदे भरण्यात यावी असे राजेश टोपे यांनी सांगितले. सरकारी ऑडिटनंतर रुग्णांना बिल मिळणार असून लक्षणे नसलेल्या रुग्णांनी घरीच क्वारंटाईन व्हावे, असा सल्ला टोपे यांनी औरंगाबाद पत्रकार परिषदेत दिला आहे.

- Advertisement -

औरंगाबाद जिल्ह्यात आज ४० कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये मनता हद्दीतील २२ आणि ग्रामीण भागातील १८ रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या १२ हजार ७११वर पोहोचली असून त्यापैकी ७ हजार ७५३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. तर ४३२ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच सध्या ४ हजार ५२६ जणांवर उपचार सुरू आहेत.


हेही वाचा – पोट भरण्यासाठी कसरती करणाऱ्या आजीला गृहमंत्र्यांची १ लाखाची मदत!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -