घरताज्या घडामोडीबंडखोर आमदारांच्या PSO, कमांडो आणि कॉन्स्टेबल यांच्यावर कारवाई होणार? प्रशासनाचे आदेश

बंडखोर आमदारांच्या PSO, कमांडो आणि कॉन्स्टेबल यांच्यावर कारवाई होणार? प्रशासनाचे आदेश

Subscribe

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Sena Rebel MLA Eknath Shinde) यांनी बंड पुकारात तब्बल तीसहून अधिक आमदारांना घेऊन सोमवारी रात्रीच सूरत गाठले. मात्र, याबाबत प्रशासनाला काहीच माहिती मिळाली नाही. त्यामुळे शिंदेंसह इतर आमदारांसोबत असलेल्या पर्सनल सिक्युरिटी ऑफिसर (PSO), कमांडो (Commando) आणि कॉन्स्टेबल (Constable) यांच्यावर कारवाई होणार असल्याचे समोर आले आहे. (Action will be taken against PSOs, commandos and constables of rebel MLAs? Order of administration)

हेही वाचा बंडखोर आमदार पालघर पोलीस संरक्षणात सीमापार, पोलीस नियंत्रण कक्षाला होते इनपूट

- Advertisement -

एवढे आमदार राज्याबाहेर जातात आणि प्रशासनाला याबाबत कुणकुणही लागत नाही, यावरून शरद पवार यांनी कालच नाराजी व्यक्त केली होती. हे आमदार महाराष्ट्राची हद्द सोडत असल्याची माहिती त्यांच्या पर्सनल सिक्युरिटी ऑफिसर, कमांडो आणि कॉन्स्टेबल यांनी प्रशासनाला आणि गुप्तचर विभागाला न दिल्याने त्या सर्वांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तसेच, त्या त्या जिल्हयातील आमदारांच्या या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा – ती राष्ट्रीय महाशक्ती कोणती?, एकनाथ शिंदेंचा खुलासा

- Advertisement -

दरम्यान, बंडखोर आमदारांना महाराष्ट्राची हद्द सोडण्यासाठी पालघर पोलिसांनी मदत केल्याचंही समोर येत आहे. विधान परिषद निवडणुकीत मतदान प्रक्रिया सुरू असताना शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना घेऊन बंडखोरांचे नेते एकनाथ शिंदे सुरतच्या दिशेने सायंकाळच्या सुमारास मुबंईहुन रवाना झाले. मुंबई अहमदाबाद महामार्गावरून त्यांचा ताफा तलासरीला पोचला. त्याठिकाणी पालघरचे शिवसेना आमदार श्रीनिवास वनगा हजर होते. आमदारांनी महाराष्ट्राच्या सीमेबाहेर गुजरातला जाण्यासाठी खानवेल मार्गे जाणे पसंत केले. खानवेल मार्गे सिल्वासाहुन वापी मार्गे शिवसेनेचे ३० हून अधिक आमदार सुखरूपपणे सुरतला गेल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा -राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना आज डिस्चार्ज मिळण्याची शक्यता

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -