‘करोना’ बाधीतांची नावे फोडणाऱ्यांवर होणार कारवाई

WHATS APP च्या माध्यमातून करोनाग्रस्तांची नावे शेअर केली जात आहेत.

corona virus and social media
'करोना' बाधीतांची नावे फोडणाऱ्यांवर होणार कारवाई

राज्यात करोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ झाली आहे. मात्र, यांची नावे शासनाने गुप्त ठेवली आहेत. परंतू सोशल मीडियातून करोना ग्रस्तांची नावे शेअर केली जात आहेत. याआधी करोनाबद्दल सेशल मीडियाच्या माध्यमातून अफवा पसरवल्या जात होत्या. राज्यात करोनाग्रस्त आढळल्यानंतर त्या रुग्णांची नावे पसरवण्यात आली आहेत. यावर आता आयुक्तांनी कारवाईचा इशारा दिला आहे.

आपत्तीच्या वेळी प्रशासनाला सहकार्य करण्याची जबाबदारी सर्वांचीच असते. करोनाग्रस्तांची नावे उघड झाल्यास विनाकारण त्यांना किंवा त्यांच्या कुटुंबीयांना त्रास होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी सामाजिक भान ठेवणे आवश्यक आहे. कोणीही नावे उघड करु नका, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसकर केले आहे.


हेही वाचा – CORONA VIRUS: अख्खा शेअर बाजार गडगडला


प्रशासन पहिल्या दिवसांपासून कुणाचीही नावे किंवा चुकीच्या गोष्टी शेअर केल्या जाऊ नयेत असे सांगत आले आहे. परंतु सोशल मीडियातून कोणीतरी चुकीची माहिती प्रसारित करत समाजामध्ये संभ्रम निर्माण करीत आसल्याच्या तक्रारी येत आहेत. त्या अनुषंगाने पोलीस विभागाचा सायबर सेल लक्ष ठेवून आहे. यामुळे अफवा पसरवत असल्याचे निदर्शनास आले तर संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल, असे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसकर सांगितले आहे.