Wednesday, May 31, 2023
27 C
Mumbai
घर मनोरंजन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी प्रशांत दामले यांची निवड

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी प्रशांत दामले यांची निवड

Subscribe

प्रशांत दामले यांचे रंगकर्मी समूह पॅनल आणि प्रसाद कांबळी यांचे आपले पॅनल या दो गटात चांगली चुरस रंगली होती.

मुंबई | अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या (Akhil Bharatiya Marathi Natya Parishad) अध्यक्षपदी अभिनेते प्रशांत दामले (Prashant Damle)यांची निवड झाली आहे. अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या निवडणुकीत प्रशांत दामलेंच्या रंगकर्मी समूह पॅनलच्या ११ जाणांवर विजय मिळाला आहे. या निवडणुकीसीठी अनेक राजकीय नेते मंडळी देखील सहभागी झाले होते. पण, या निवडणुकीत प्रशांत दामले यांचा विजय झाला आहे.

प्रशांत दामले यांचे रंगकर्मी समूह पॅनल आणि प्रसाद कांबळी यांचे आपले पॅनल या दोन गटात चांगली चुरस रंगली होती. या दोघांमध्ये अखिल अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या कोण विजयी होणार, याकडे सर्वाचे लक्ष लागले होते. यानंतर  मुख्य निवडणूक अधिकारी गुरुनाथ दळवी यांनी प्रशांत दामले यांची अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याच घोषणा केली आहे.

- Advertisement -

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी प्रशांत दामलेंची निवड झाली आहे. या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या ११ जणांची कार्यकारिणीवर निवड करण्यात आली आहे. यात सुशांत शेलार, गिरीश महाजन, विजय चौगुले, संदीप तेंडुलकर, दीपा क्षीरसागर, सविता मालपेकर, संदीप पाटील, विशाल शिंगाडे, विजयकुमार साळुंखे, संजय रहाटे, दीपक रेगेंचा कार्यकारिणीत समावेश आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -