Homeमहाराष्ट्रRahul Solapurkar : त्या टकलू हैवानाच्या तोंडाला काळं फासू द्या...; शिवप्रेमींचे सोलापूरकरच्या...

Rahul Solapurkar : त्या टकलू हैवानाच्या तोंडाला काळं फासू द्या…; शिवप्रेमींचे सोलापूरकरच्या घराबाहेर आंदोलन

Subscribe

पुणे – छत्रपती शिवाजी महाराज हे आग्र्याहून लाच देऊन सुटले होते, असे वक्तव्य करणारा अभिनेता राहुल सोलापूरकर याच्या घराबाहेर ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी आंदोलन सुरु केले आहे. “राहुल सोलापूरकर मला गावला, तर मी त्याला सोडणार नाही. त्याच्या तोंडाला काळं फासणार. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या या व्यक्तीला सुरक्षा कसली देता? त्याच्यावर कारवाई करायचं सोडून घराबाहेर पोलीस तैनात केले आहेत.”, असं आक्रमक वक्तव्य ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याने या आंदोलनात केलंय.

सोलापूरकर नाक घासून माफी माग, ठाकरेंचे शिवसैनिक आक्रमक 

अभिनेता राहुल सोलापूरकर याच्या कोथरूड येथील घराबाहेर ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी आंदोलन सुरु केले आहे. सोलापूरकरला अटक करा अशी मागणी त्यांच्याकडून केली जात आहे. तर पोलिसांचा मोठा बंदोबस्त कोथरूडमध्ये तैनात करण्यात आला आहे. राहुल सोलापूरकरने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर नाक घासून माफी मागावी, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. सोलापूरकरने बुधवारी सामाज माध्यमावर एक व्हिडिओ पोस्ट करुन माझे वक्तव्य मोडतोड करुन दाखवण्यात आल्याचा दावा केला होता.

आंदोलकांनी सोलापूरकर यांच्या घराबाहेर ठिय्या दिला आहे. पोलिसांनी त्यांना पांगवण्याचा प्रयत्न केला, मात्र आंदोलकांनी आम्हाला कशाला पकडता, त्याला अटक करा, अशा घोषणा दिल्या आहेत. सोलापूरकर भाजपच्या मंचावर दिसतो, तो भाजपचे काम करतो का, म्हणून त्याला अटक करत नाही का, अशा संतप्त भावना आंदोलकांनी व्यक्त केल्या आहेत.

काय म्हणाला होता राहुल सोलापूरकर

अभिनेते राहुल सोलापूरकरने एका युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली होती. या मुलाखती दरम्यान शिवाजी महाराजांची आग्र्यातून सुटका यावर त्याने वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्याने म्हटले होते की, ‘पेटारे- बिटारे असं काही नव्हतंचं. छत्रपती शिवाजी महाराज चक्क लाच देऊन आग्र्याहून सुटून आले होते. त्यासाठी त्यांनी किती हुंड्या दिल्या याचे पुरावे सुद्धा आहेत आणि ते आपल्याकडेच आहेत. त्यांनी औरंगजेबाचा वजीर आणि अगदी त्याच्या बायकोलासुद्धा लाच दिली होती. मोहसीन खान की मोईन खान नाव असलेल्या एका सरदाराकडून सही- शिक्क्याचं अधिकृत पत्र महाराजांनी घेतले आणि त्याच्याकडून घेतलेला परवाना दाखवत ते आग्र्यातून बाहेर पडले. शेवटी स्वामी परमानंद पाच हत्ती घेऊन आग्र्यातून बाहेर पडले. याचे पुरावेदेखील आपल्याकडे आहेत. मुख्य म्हणजे परमानंदांकडेसुद्धा परवानगी होती. मात्र, हा सगळा इतिहास गोष्ट स्वरुपात सांगायचा म्हटलं की थोडे रंग भरून सांगावे लागतात. पण या नादात इतिहासाला छेद दिला जातो.’

हेही वाचा : Rahul Solapurkar : छत्रपती शिवाजी महाराजांच्या विधानावरून वाद, राहुल सोलापूरकरांनी दिले हे स्पष्टीकरण