Eco friendly bappa Competition
घर उत्तर महाराष्ट्र अभिनेता शाहरूख खान म्हणतो ‘थँक्यू नाशिक’; 'हे' आहे कारण...

अभिनेता शाहरूख खान म्हणतो ‘थँक्यू नाशिक’; ‘हे’ आहे कारण…

Subscribe

नाशिक : बॉलिवुडचा बादशाह म्हणून ओळखला जाणारा अभिनेता शाहरूख खान (Shah Rukh Khan) यांने खास व्टिट करत नाशिककरांचे आभार मानले आहेत. शाहरूख चा जवान (Jawan movie) चित्रपट ७ सप्टेंबरला प्रदर्शित होत असून नाशिकमधील एका चाहत्याने शाहरूखला व्टिट करत आपण जवान चित्रपटाचे बुकिंग केल्याचे म्हटले आहे. यावर प्रतिक्रिया देतांना किंग खान ने ‘थँक्यू नाशिक’ असे म्हटले आहे.

अभिनेता शाहरुख खान हा ट्विटरवर नेहमीच अ‍ॅक्टिव्ह असतो. अशातच तो #AskSRK या हॅशटॅगखाली आपल्या फॅन्सशी संवाद साधत असतो. यातून अनेकदा फॅन्सने केलेल्या ट्विटला रिप्लाय देत तो चाहत्यांची मने जिंकत असतो. अशातच शाहरुख खानचा बहुप्रतीक्षित जवान चित्रपट येऊ घातलेला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला. यानंतर शाहरुख खानने ट्विटरवर आपल्या चाहत्यांशी #AskSRK च्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी नाशिकच्या एका चाहत्याने ट्विटरवर शाहरुख खानला #AskSRK या हॅशटॅग खाली टॅग करत नाशिकमधून अ‍ॅडव्हान्स बुकिंग झाल्याची पोस्ट केली. यावर शाहरुख खानने ‘थँक्यू नाशिक’ म्हणत नाशिककरांची आभार मानले आहेत. काही दिवसांपूर्वी शाहरुखचा पठाण हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. आता जवान चित्रपट पठाण चित्रपटाप्रमाणेच बॉक्स ऑफिवर कोट्यवधींची कमाई करेल का? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

2 लाख टिकीटांचे अ‍ॅडव्हान्स बुकिंग

- Advertisement -

अभिनेता शाहरुख खानच्या जवान या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. जवान’च्या  चाहते आतुर असून तिकीट खरेदीही रेकॉर्ड ब्रेक सुरु आहे. जवान चित्रपट 7 सप्टेंबरला प्रदर्शित होणार असून चित्रपटाची अ‍ॅडव्हान्स बुकींग 1 सप्टेंबरपासून सुरु झाली आहे. जवान चित्रपटाने अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्ये रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. रविवारी दुपारी 12 वाजेपर्यंत जवान चित्रपटाची 2 लाखांहून अधिक तिकीटांची विक्री झाली आहे. फर्स्ट डे फर्स्ट शो बुकींगवर चाहत्यांचा भर असून पीव्हीआर आणि आयनॉक्स  ची 168,000 तिकीटे आणि सिनेपॉलिसमध्ये 35,300 तिकीटांची अ‍ॅडव्हान्स बुकींग झाली आहे. आतापर्यंत एकूण पहिल्या दिवशीसाठी 2,03,300 तिकीटांची अ‍ॅडव्हान्स बुकींग झाली आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -