Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश अभिनेता शरद पोंक्षेंनी काँग्रेससंदर्भात पुन्हा केले मोठे विधान; म्हणाले...

अभिनेता शरद पोंक्षेंनी काँग्रेससंदर्भात पुन्हा केले मोठे विधान; म्हणाले…

Subscribe

मुंबई : “स्वातंत्र्यपूर्व काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि बॅरिस्टर जिना हे तिघे एकत्र आले असते. तर देशाचे चित्रच वेगळे असते. तसेच देशात काँग्रेस नावाचा जन्मालाच आले नसते”, असे मोठे विधान अभिनेता शरद पोंक्षे यांनी केले. नाशिकमध्ये कार्यक्रमासाठी शरद पोंक्षे गेले असताना त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या वाड्याला भेट देत अभिवादन केले.

यावेळी शरद पोंक्षे म्हणाले, “स्वातंत्र्यवीर सावरकर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्यामध्ये साम्य आहे. रत्नागिरी सावरकरांनी त्यांच्या आयुष्यातील 13 वर्षे दलितांच्या उद्धारासाठी खर्ची केली. सावरकरांचे विचार म्हणजे धगधगते अग्निकुंड आहे.” शरद पोंक्षे हे सावरकरांचा वाड्याला भेटीसाठी गेले असताना येथील व्यवस्थापक मनोज कुवर यांनी त्यांचे स्वागत केले आणि शरद पोंक्षेंना वाड्याची माहिती दिली. त्यासोबत शरद पोंक्षेंना ‘माझी जन्मठेप’ हे पुस्तक भेट दिली.

- Advertisement -

हेही वाचा – शरद पोंक्षेंनी राहुल गांधीवर केलेल्या टीकेला काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून प्रत्युत्तर

शरद पोंक्षेंची राहुल गांधींवर टीका

राहुल गांधी काही ओरिजनल गांधी नसून खान आहे, अशी टीका अभिनेते शरद पोंक्षे यांनी काँग्रेस राहुल गांधीवर केली आहे. स्वातंत्रदिनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहरात तिरंगा रॅलीसह विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भारतीय विचार मंच तर्फे प्रबोधन आणि जनजागृतीसाठी वीर सावरकरांच्या जीवनावरील व्याखान आयोजित करण्यात आले होते. यावेळी शरद पोंक्षे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी शरद पोंक्षे म्हणाले, “तू गांधी नाही अन् सावकर देखील नाही. हे काही ओरिजनल गांधी नसून तर खान आहेत. महात्मा गांधींचे वंशजही नाहीत. गांधींच्या आडनावांचा फायदा यांनी घेतला. मुळचे हे फिरोज खान हाच यांचा इतिहास आहे. या मुर्खांना त्यांच्या आजीचा इतिहास माहीत नाही. मग सावरकरांचा इतिहास कसा माहिती असणार?, असा सवाल करत त्यांनी टीका केली. हे व्याख्यानाचे आयोजन मालेगावातील सटाणा नाका येथील श्रीलक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात करण्यात आले होते. या कार्यक्रमात दादा भुसे देखील उपस्थितीत होते. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.

- Advertisement -

- Advertisment -