हिंदू समाजाबाबत अभिनेते शरद पोक्षेंच मोठ विधान, म्हणाले, अहिंसक हिंदू समाज कधी…

actor sharad pokshe

मराठी अभिनेते शरद पोक्षे स्पष्ट आणि परखड व्यक्तीमत्वासाठी ओळखले जातात. अनेकदा त्यांना आपल्या परखड मतांमुळे टीकेला समोरे जावे लागले. अशात त्यांनी हिंदू समाजाबाबत एक मोठं विधान केल आहे. अहिंसा परमो धर्म: यामध्ये केवळ अर्धाच श्लोक आम्हा शिकवण्यात आला. अहिंसा हा सर्वश्रेष्ठ धर्म आहे आणि या सर्वश्रेष्ठ धर्माच्या रक्षणासाठी हातात शस्त्र उचलणे हा त्याही पेक्षा मोठा धर्म आहे हे मात्र आम्हाला शिकवलं नाही. अहिंसेसारखे दुसरे शस्त्र नाही, अहिंसा परमो धर्म:चे एवढे डोस आम्हाला पाजले की, हा अहिंसक हिंदू समाज कधी नपुसंक झाला हे समजलेच नाही, असं परखड मत सावरकर अभ्यासक, अभिनेते शरद पोंक्षे यांनी मांडले आहे.
ते डोंबिवलीत एका कार्यक्रमात बोलत होते.

यावेळी ते पुढे म्हणाले की, आम्हाला राग, चिड येत नाही कारण आम्हाला शौर्याचा इतिहास शिकवला आहे. रक्त न सांडता स्वातंत्र्य मिळाले यावर आपला विश्वास आहे, मात्र हा ज्यांनी स्वातंत्र्यासाठी रक्त सांडले त्यांचा घोर अपमान आहे.

राष्ट्राला सर्व विचारांची गरज असते, पण ती तेवढ्याच प्रमाणात. हिंदूस्तान हा हिंदूंचा आहे. यामध्ये कम्युनिझम, समाजवाद हेही हवेत त्यांच्याशिवाय चालणार आहे. पण त्यांचे प्रमाण ठरले आहे ते राजाला कळते जो सुसंस्कृत असतो. तो कधी उपोषण होऊ देत नाही, उपोषण हा कधीच मार्ग नाही. राजा सुसंस्कृत असला की उपोषण तेव्हाच यशस्वी होते. सुसंस्कृत राजा असणे म्हणजे काय? एक प्रभू श्रीरामांचे रामराज्य व दुसरे छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य. असे राज्य चालविणारा राजा असावा. असे पोंक्षे म्हणाले.


नाक मुठीत धरूनच ‘त्या’ 50 जणांना फडणवीसांकडे जावे लागेल; ‘सामना’तून शिंदे सरकारवर टीका