हे चित्र आम्हा हिंदूंना सुखावणारं…शरद पोंक्षेंकडून मुख्यमंत्री शिंदेंचे कौतुक

अभिनेते शरद पोंक्षें (sharad ponkshe) यांनी त्यांच्या इन्स्टा अकाऊंटवरून शेअर केला आहे त्यात हे चित्र आम्हा हिंदूंना सुखावणारं आहे असं त्यांनी म्हटलं आहे.

sharad ponkshe

शिवसेनेचे एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर प्रभादेवीच्या सिद्धीविनायक मंदिरात दर्शनासाठी गेले होते. त्यानंतर त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकालाही भेट दिली होती. यावेळी सावरकरांच्या पुतळ्याचे त्यांनी अभिवादन केले. त्याप्रसंगीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा फोटो अभिनेते शरद पोंक्षें (sharad ponkshe) यांनी त्यांच्या इन्स्टा अकाऊंटवरून शेअर केला आहे त्यात हे चित्र आम्हा हिंदूंना सुखावणारं आहे असं त्यांनी म्हटलं आहे. शरद पोंक्षे सोशल मीडियावर सक्रिय असतात. आता त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सावरकरांना अभिवादन करतानाचा फोटो शेअर केला आहे. तसेच हिंदूना सुखावणार हे चित्र असल्याचेही ते म्हणाले आहेत.

शरद पोंक्षे यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर एक टि्वट केले होते. त्यात त्यांनी त्यांच्या आजारापणात शिंदेंनी केलेल्या मदतीचा उल्लेख केला होता.

कर्करोगाशी लढताना मोठ्या भावासारखे मा शिंदेसाहेब माझ्या पाठीशी खंबीरपणाने उभे राहीले असं म्हणत फोटोसह एकनाथ शिंदेप्रती आपल्या भावना त्यांनी व्यक्त केल्या होत्या. यामुळे पोंक्षे हे शिंदेच्या किती जवळ आहेत ते अधोरेखीत झाले होते.