घरताज्या घडामोडीअदानी समुहाकडे नवी मुंबई विमानतळाचा ताबा

अदानी समुहाकडे नवी मुंबई विमानतळाचा ताबा

Subscribe

गौतम अदानी यांची एअरपोर्ट होल्डिंग प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी भारतातील सर्वात मोठी विमानतळ हाताळणी कंपनी ठरली

नवी मुंबईत होणारे आंतरराष्ट्रीय विमानतळ चालवण्यासाठी अदानी एअरपोर्ट होल्डिंग प्रायव्हेड लिमिटेड या कंपनीला देण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. हे विमानतळ ‘सरकारी-खाजगी भागीदारी’ तत्वावर सुप्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांच्या कंपनीला चालवण्यासाठी देण्यात येणार आहे.

बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली झालेल्या राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत हे विमानतळ चालवण्यासाठी अदानी समूहाच्या अदानी एअरपोर्ट होल्डिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला देण्याचे निश्चित करण्यात आले. यापूर्वी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ चालवणारी कंपनी जीव्हीकेला नवी मुंबईतील विमानतळ विकसित करून चालवण्यासाठी देण्याचे ठरवण्यात आले होते. मात्र गेल्यावर्षी अदानी एअरपोर्ट होल्डिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला हा प्रकल्प देण्याचे निश्चित करण्यात आले. त्याला नागरी उड्डाण महासंचालनालय, विमानतळ प्राधीकरण, सेबी, सीसीआय आणि अंतिमत: सिडकोने मान्य दिली. या विमानतळाच्या बांधकामावर सिडिकोचे लक्ष असेल.

- Advertisement -

नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळ हाताळण्याचे कंत्राट अदानी समुहाला मिळाल्यामुळे अदानी समुहाचे प्रमुख गौतम अदानी यांची एअरपोर्ट होल्डिंग प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी भारतातील सर्वात मोठी विमानतळ हाताळणी कंपनी ठरली आहे. या कंपनीकडे मुंबई, नवी मुंबई, अहमदाबाद, लखनौसह अजून तीन विमानतळ चालवण्याचे प्रकल्प आहेत.
अदानी एअरपोर्ट होल्डिंग प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी अदानी इंटरप्रायजेस लिमिटेड या कंपनीशी सलग्न कंपनी आहे. त्यांच्याकडे आता नवी मुंबई विमानतळाचे सर्वाधिक २६ टक्के भागीदारी आहे. नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळ हे १,१६० हेक्टर भूखंडावर साकरणार आहे. हे विमानतळ २०२३-२४ पासून कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. एकदा का या विमानतळाचे काम सुरू झाले की,पुढील दशकात ते देशातील सर्वात मोठे आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय विमानतळ म्हणून गणले जाण्याची शक्यता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -