अदानी ग्रुपवर आर्थिक संकट, मग आता धारावीच्या पुनर्विकास प्रकल्पाचं काय? वाचा सविस्तर

अमेरिकेतील हिंडेनबर्ग रिसर्चच्या (Hindenburg Research) अहवालामुळे अदानी ग्रुपला मोठा फटका बसला आहे. शेअर बाजारातील अदानी समूहाचे शेअर कोसळल्यापासून ते श्रीमंतांच्या यादीतील घसरलेल्या क्रमांकापर्यंत गौतम आदानी यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक तोटा सहन करावा लागतो आहे.

अमेरिकेतील हिंडेनबर्ग रिसर्चच्या (Hindenburg Research) अहवालामुळे अदानी ग्रुपला मोठा फटका बसला आहे. शेअर बाजारातील अदानी समूहाचे शेअर कोसळल्यापासून ते श्रीमंतांच्या यादीतील घसरलेल्या क्रमांकापर्यंत गौतम आदानी यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक तोटा सहन करावा लागतो आहे. असं असतानाच आता मुंबईतील धारावी (Dharavi) पुनर्विकास प्रकल्पाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. (adani group dharavi redevelopment project will be stopped in mumbai)

अदानी समूहाला धारावीच्या पुनर्विकासाचे (Dharavi redevelopment project) कंत्राट देण्यात आले आहे. परंतु, हिंडनबर्गच्या रिपोर्टमुळे अदानी आर्थिक संकटात असल्यामुळे धारावी प्रकल्पासाठी अदानी समूहाला (Adani Group) पतपुरवठा मिळवणे कठीण झाले आहे. त्यामुळे हा प्रकल्प आणखी रखडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सध्या भारतीय मार्केटमध्ये (Share Market) अदानी समूहाचे शेअर कोसळले आहेत. त्यामुळे अदानी ग्रुपने मार्केटमधून एक्झिट घेतली आहे. त्यातच अदानी यांच्या कंपन्यांच्या शेअर्सच्या खरेदी विक्रीच्या प्रत्येक व्यवहारावर आता काटेकोर लक्ष असणार आहे. निर्बंध असणाऱ्या कंपनीचे शेअर्स विकत घ्यायचे असतील किंवा विकायचे असतील तर व्यवहार करणाऱ्या ट्रेडिंग अकाऊंटमध्ये व्यवहारासाठी आवश्यक असलेली 100 टक्के रक्कम जमा करणं बंधनकारक असेल.

हिंडनबर्गने अदानी समूहाच्या व्यवहारांविषयी एकूण 88 प्रश्न उपस्थित केले आहेत. गौतम अदानी आणि त्यांच्या कंपन्यांना त्यांच्या परतफेड क्षमतेपेक्षा जास्त कर्ज देण्यात आल्याचा आरोप हिंडनबर्गच्या रिपोटमध्ये ठळकपणे अधोरेखित करण्यात आला आहे. त्यामुळे आता नवीन प्रकल्प हाती घेण्यासाठी पैसे उभे करताना अदानींच्या मार्गात आणि पर्यायाने धारावी पुनर्विकासात पुन्हा एकदा अडथळे निर्माण होऊ शकतात.

सध्याच्या प्रकल्पांवर, धोरणात्मक वाढीवर कोणताही परिणाम नाही

“सध्या सुरू असलेल्या परिस्थितीचा Adani Realtyच्या सध्याच्या प्रकल्पांवर आणि धोरणात्मक वाढीवर कोणताही परिणाम होणार नाही. आम्ही ते हाती घेण्यास आणि ते यशस्वीपणे पार पाडण्यासाठी वचनबद्ध आहोत. Adani Realtyचे मजबूत व्यवसाय मूलतत्त्वे आणि दीर्घकालीन दृष्टीकोन आर्थिक वचनबद्धतेची पूर्तता करण्यासाठी आणि त्याच्या भागधारकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी केंद्रित आहे”, असे अदानी समुहाच्या प्रवक्त्यांनी सांगितले.


हेही वाचा – ‘जो लड़ सका है वो ही तो महान है’, जितेंद्र आव्हाडांचे ‘ते’ ट्वीट चर्चेत