घरअर्थजगतमुंबई विमानतळानंतर आता महाराष्ट्राच्या व्यापारी मार्गावर अदानींचा ताबा

मुंबई विमानतळानंतर आता महाराष्ट्राच्या व्यापारी मार्गावर अदानींचा ताबा

Subscribe

मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाचा ताबा घेतल्यानंतर आता राज्यातील व्यापारी मार्गाचा ताबा घेतला आहे. महाराष्ट्र सीमेवरील तपासणी नाक्यांचा प्रकल्पावर अदानी समुहाचा ताबा असणार आहे. या ठिकाणी २४ तपासणी नाके होते. या व्यापारी मालवाहतुकीवरील सेवा शुल्क संकलनाचे अधिकार असलेल्या ‘सद्भाव इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट लिमिटेड’च्या कंपनीतील ४९ टक्के वाटा अदानी समुहाने विकत घेतला आहे. यासाठी तब्बल १६८० कोटी मोजले आहेत. त्यामुळे आता महाराष्ट्रातून बाहेर जाणाऱ्या किंवा महाराष्ट्रात येणाऱ्या व्यापारी वाहतुकीवरील ‘सेवा शुल्क’ वसुलीचे अधिकार अदानीला मिळाले आहेत.

महाराष्ट्राच्या व्यापारी वाहतुकीवरील सेवा शुल्कांचे अधिकार असलेल्या ‘महाराष्ट्र बॉर्डर चेक पोस्ट नेटवर्क लि.’ या कंपनीतील ४९ टक्के वाटा १६८० कोटी रुपयांना ‘अदानी रोड ट्रान्सपोर्ट लि.’ या कंपनीने विकत घेतल्याची माहिती अदानी समूहाने सोमवारी जाहीर केली. अजून वाटा खरेदी करण्याची तयारी अदान मुहाची असून त्यासाठी नियामक संस्थेची परवानगी लागेल, असं सांगण्यात आलं आहे. २०३३ पर्यंतचा राज्याच्या सीमेवरील २४ तपासणी नाक्यांचा ताबा व तेथील सेवा शुल्क वसुलीचा अधिकार अदानी रोड ट्रान्सपोर्टला मिळणार आहे.

- Advertisement -

एका राज्यातून दुसऱ्या राज्यात प्रवेश करताना व्यापारी वाहतूक करणाऱ्यांना गाड्यांना शुल्क द्यावं लागतं. महाराष्ट्राची सीमा गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, कर्नाटक आणि गोवा या सहा राज्यांशी जोडली आहे. त्यामुळे या सीमेवर २४ तपासणी नाके आहेत.

मुंबई उपनगरातील वीजवितरण व्यवसाय, मुंबई आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा ताबा देखील अदानी समुहाने घेतला आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -